एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आता LPG सिलेंडरसाठी अतिरिक्त 32 रुपये मोजावे लागणार!
नवी दिल्ली : देशभरात 1 जुलैपासून जीएसटी लागू झाल्यानंतर त्याचा परिणाम आता सर्वसामान्यांवर दिसायला लागला आहे. जीएसटी लागू होताच घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढले आहे. आता एलपीजी सिलेंडरसाठी 32 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे.
जीएसटी आणि सरकारने गॅस अनुदानातही घट केल्या दर वाढले आहेत.
जीएसटी लागू होण्याआधी अनेक राज्यांना एलपीजीसाठी टॅक्स द्यावा लागत नसे. पण काही काही राज्यांमध्ये यावर 2 ते 4 टक्के व्हॅट लागत होता. पण आता एलपीजी जीएसटीच्या 5 टक्के स्लॅबमध्ये ठेवलं आहे. त्यामुळे एलपीजीच्या किंमतीत 12 ते 15 रुपयांनी वाढ झाली आहे.
याशिवाय जूनपासून गॅस अनुदानात केलल्या कपातीचा परिणाम ग्राहकांवर होणार आहे. अशाप्रकारे ग्राहकांवर पडणाऱ्या दुहेरी दबावामुळे एलपीजी सिलेंडरची किंमत 32 रुपयांपर्यंत वाढू शकते.
याशिवाय एलपीजी वापरणाऱ्यांना दोन वर्ष अनिवार्य असलेला इन्स्पेक्शन, नवं कनेक्शन आणि अतिरिक्त सिलेंडरच्या दस्तऐवजांचा अॅडमिनिस्ट्रेशन चार्जही द्यावर लागणार आहे. कारण नवी गॅस जोडणी आणि अतिरिक्त एलपीजी 18 टक्क्यांच्या जीएसटी स्लॅबममध्ये ठेवण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
Advertisement