एक्स्प्लोर
Advertisement
'ईपीएफओ'च्या 'या' कर्मचाऱ्यांना 50 हजारांचा लॉयल्टी बोनस
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओच्या दीर्घकालीन सभासदांसाठी खुशखबर आहे. 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जुन्या खातेधारकांना घसघशीत लाभ होणार आहे.
20 वर्षे किंवा त्याहून जास्त कालावधीपासून पीएफ खातं असणाऱ्या सभासदांना 50 हजार रुपयांचा लाभ होणार आहे. बांधिलकी रक्कम (लॉयल्टी बोनस) म्हणून खातेदाराला 50 हजार रुपये देण्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवण्यात आला आहे.
निवृत्तीच्या वेळी ही रक्कम खातेधारकांना मिळणार आहे. मूळ वेतन पाच हजार रुपयांपर्यंत असलेल्या कर्मचाऱ्यांना 30 हजार रुपये, तर पाच हजार ते दहा हजार रुपयांदरम्यान मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना 40 हजार रुपयांचा लाभ होईल.
विशेष म्हणजे ईपीएफओ अंतर्गत विमा उतरवलेल्या खातेदारांचा खाते कालावधीतच मृत्यू झाल्यास अडीच लाखांची भरपाईही मिळणार आहे.
पीएफचे पैसे आता मोबाईलद्वारे काढा, लवकरच 'उमंग' अॅप
उमंग या अॅपद्वारे पीएफचे पैसे काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यामुळे 4 कोटी सदस्यांना फायदा होईल, अशी माहिती कामगार मंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी दिली होती. ईपीएफओला दररोज पीएफचे पैसे काढण्यासाठी, पेंशन संबंधीत किंवा पीडित कर्मचाऱ्यांसंबंधीत इंशुरन्स काढण्यासाठी जवळपास 1 कोटी अर्ज येतात. या सर्व अर्जांचं काम कागदोपत्री केलं जातं. त्यामुळे ऑनलाईन प्रणालीमुळे नोकरदारांची मोठी समस्या कमी होणार आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement