एक्स्प्लोर

देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घसरण, महाराष्ट्रात दिवसभरात 3645 रुग्णांची नोंद

भारतात मागील 24 तासात 36 हजार 469 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. 18 जुलैनंतरचही ही सर्वात कमी संख्या आहे. तर महाराष्ट्रात काल 3 हजार 645 रुग्ण आढळले.

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा संकट कायम असलं तरी त्यात एक आशेचा किरण दिसू लागला आहे. कारण देशभरात मागील 24 तासात 36 हजार 469 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 488 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जुलै महिन्यानंतर देशात पहिल्यांदाच एका दिवसात एवढ्या कमी कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. 18 जुलै रोजी देशात 34 हजार 884 कोरोबाधित आढळले होते. यासोबतच देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूदरातही सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. आता हा मृत्यूदर 1.5 टक्के आहे. आरोग्य मंत्रालायाच्या माहितीनुसार आता 14 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा मृत्यदर एक टक्क्यापेक्षाही कमी आहे.

देशभरात आतापर्यंत 1 लाख 19 हजार 502 जणांचा मृत्यू आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 79 लाख 46 हजार 430 आहे. त्यापैकी एक लाख 19 हजार 502 जणाचा मृत्यू झाला आहे. तर 72 लाख एक हजार 70 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 6 लाख 25 हजार 857 जणांवर उपचार सुरु आहे. काल (26 ऑक्टोबर) 63 हजार 842 जण बरे होऊन घरी परतले आहेत.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) आज (27 ऑक्टोबर) सांगितलं की, देशात 26 ऑक्टोबरपर्यंत एकूण 10 कोटी 44 लाख 20 हजार 894 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी काल 9 लाख 58 हजार 116 जणांची चाचणी केली.

देशातील सर्वाधित कोरोनाबाधित महाराष्ट्रात हाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात काल 3 हजार 645 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात काल 9 हजार 905 रुग्ण बरे झाले असून 84 जणांचा मृत्यू झाला. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 16 लाख 48 हजार 665 झाली आहे. त्यापैकी 14 लाख 70 हजार 660 कोरोनामुक्त झाले असून 43 हजार 344 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 1 लाख 34 हजार 137अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात सर्वाधित कोरोनाबाधित महाराष्ट्रातच आहेत.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर पुण्यात देशात सर्वाधिक पुण्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर देशात सर्वाधिक असल्याचं समोर आलं आहे. रविवापर्यंत (25 ऑक्टोबर) पुणे शहरातील तब्बल 1 लाख 48 हजार 870 रुग्ण करोनातून संपूर्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्णा बरे होण्याच्या बाबतीत पुण्याने मुंबई, बंगळुरु, कोलकाता आणि अहमदाबाद या शहरांना मागे टाकलं आहे. रविवारी पुणे शहरातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 93.21 टक्के एवढा नोंदवण्यात आला. मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचा दर 90.76 टक्के आहे. बंगळुरुत 81.17 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. कोलकाता शहरात रुग्ण बरे होण्याचा दर 87.22 टक्के तर अहमदाबाद शहरात 86.99 टक्के एवढा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget