एक्स्प्लोर

कोरोना काळात नोकरी गेली, पण एका फोन कॉलमुळे नशीब उघडलं!

कोरोना काळात अनेकांच्या नोकरीवर गदा आली. मुळात पैशांअभावी जीवनाची बसलेली संपूर्ण घडीच विस्कटली. पण, इथे एका व्यक्तीला मात्र नोकरी गेल्यानंतर एका वेगळ्याच पद्धतीनं जीवनातील अनपेक्षित आनंदाची प्रतिची आली आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसनंतरचं आयुष्य किंवा दैनंदिन जीवनातील बऱ्याच गोष्टी बदललेल्या असतील. किंबहुना या बदलांची काही अंशी सुरुवातही झाली आहे. हा बदल काहींसाठी सकारात्मक आहे, तर काहींसाठी नकारात्मक. जगभरात थैमान घालणाऱ्या या विषाणूनं सर्वच बाबतींत अडचणींचा डोंगर उभा केला. यामध्ये नोकऱ्या गमावलेल्यांची संख्या तुलनेनं जास्त. पण, त्यातूनही नोकरी गमावलेल्या एका तरुणाच्या नशीबाला अनपेक्षित कलाटणी मिळाल्याची घटना घडली आहे. ज्यामुळं सध्या याचीच चर्चाही सुरु आहे.

नवनीत संजीवन असं या 30 वर्षीय तरुणाचं नाव. तो मूळचा केरळचा आहे. तो अबूधाबीतील एका कंपनीत नोकरी करत होता. पण कोरोना काळात त्याला नोकरी गमवावी लागली. कंपनीवर आलेल्या आर्थिक संकटामुळं त्यालाही नोकरी सोडण्यास सांगण्यात आलं. सध्या नवनीत या कंपनीत नोटीस पीरिएडवर आहे.

सोबतच तो इतर ठिकाणी नोकरीच्या शोधातही आहे. काही ठिकाणी त्यानं मुलाखतीही दिल्या आहेत. नोकरीच्या फोनकॉलच्या प्रतिक्षेत असणाऱ्या नवनीतला एके दिवशी असाच एक फोनकॉल आला आणि त्याच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली. नवनीतला आलेला हा फोन होता दुबई ड्यूटी फ्रीचा. DDF Millennium Millionaire Draw प्रकारातील लॉटरीमध्ये त्याला तब्बल 1 मिलियन डॉ़लरची लॉटरी लागली आहे, असं या फोनकॉलमध्ये सांगण्यात आलं.

1 जानेवारीपासून बदलणार बँक, वीमा योजनेतील महत्त्वाचे नियम, पाहा पूर्ण यादी

मूळचा केरळमधील कासारगोडचा असलेला नवनीत विवाहित असून तो पत्नी आणि लहानग्या मुलासह दुबईतच राहतो. त्यानं हे लॉटरीचं तिकीट 22 नोव्हेंबरला विकत घेतलं होतं. त्याची पत्नी अद्यापही दुबईमध्ये नोकरी करत असून, नवनीतही नोकरीच्या शोधात आहे. नोकरी न मिळाल्यास दुबईतून पुन्हा मायदेशी परतण्याच्या विचारात तो होता. आपल्यावर असणारं एक लाख दिरामचं कर्ज फेडण्यासाठीच तो प्रयत्न करत असल्याची माहिती त्यानं 'गल्फ न्यूज'शी संवाद साधताना दिली.

डीडीएफ लॉटरी जिंकणारा नवनीत हा 171 वा भारतीय आहे. या लॉटरीच्या सोडतीमध्ये आजवर अनेक भारतीयांना बक्षिस घोषित झालं आहे. सहसा लॉ़टरी आणि तत्सम प्रकार हे नशीबाचाच भाग समजले जातात. कित्येकांचा यावर विश्वासही बसत नाही. पण, नवनीतसारखी उदाहरणं पाहता खरंच नशीबही कलाटणी घेतं आणि तेसुद्धा अगदी अनपेक्षितपणे हेच सिद्ध होत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Hindmata Junction : मुंबईत हिंदमाता जंक्शनवर पाणी साचलंMumbai Goa Express Way : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 12 तासांपासून ठप्प, वाहतूक विस्कळीतThane To CSMT Railway Update : ठाणे ते सीएसएमटी आणि सीएसएमटीहून ठाण्याकडे लोकल रवानाThane To CSMT Canceled : ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या रेल्वे रद्द

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
Embed widget