एक्स्प्लोर

'लोक यांना बुटांनी मारतील', राहुल गांधींवर टीका करताना जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांची जीभ घसरली!

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून पाकिस्तानवर निशाणा साधला होता. काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं सांगत, जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तान हिंसा भडकावण्याचं काम करत असल्याचा आरोप केला होता.

श्रीनगर : जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम 370 हटल्यानंतर राज्यपाल सत्यपाल मलिक आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यामधील वाकयुद्ध सुरुच आहे. राज्यपाल मलिक यांनी आता राहुल गांधींवर काश्मीरबाबत त्यांच्या भूमिकेवरुन हल्लाबोल केला आहे. मात्र टीका करताना राज्यपालांची जीभ घसरली. ते म्हणाले की, "जर राहुल गांधी कलम 370 चे समर्थक असतील तर लोक त्यांना बुटांनी मारतील." काय म्हणाले सत्यपाल मलिक? राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले की, "राहुल गांधी देशातील प्रतिष्ठित कुटुंबातील आहेत, परंतु ते राजकीय नवशिक्याप्रमाणे वागले आहेत. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राला लिहिलेल्या पत्रात राहुल गांधींच्या वक्तव्याचा उल्लेख केला आहे. गांधींनी हे करायला नको होतं. ज्यावेळी देशात निवडणूक होईल, त्यांच्याविरोधात काही बोलण्याची गरज नाही. केवळ एवढंच सांगितलं की राहुल गांधी 370 चे समर्थक आहेत, तो लोक बुटांनी मारतील." काँग्रेसने काश्मीरवर भूमिक स्पष्ट केलेली नाही : सत्यपाल मलिक कलम 370 हटवल्यानंतर आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत राज्यपाल सत्यपाल सिंह यांनी काँग्रेसला काश्मीरच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं आहे. राज्यपाल मलिक म्हणाले की, "ज्यावेळी त्यांच्या पक्षाचा नेता संसदेत काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्राशी जोडत होता, त्यावेळी राहुल गांधींना बोलायला हवं होतं." लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांच्याकडे इशारा करताना मलिक म्हणाले की, "जर राहुल गांधी नेते होते, तर त्यांनी चौधरी यांना थांबवायला हवं होतं. काश्मीरच्या मुद्द्यावर पक्षाची ही भूमिका आहे, असं सांगायला हवं होतं. त्यांनी आतापर्यंत काश्मीरबाबात भूमिका स्पष्ट केलेली नाही." राहुल गांधींची पाकिस्तानवर टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून पाकिस्तानवर निशाणा साधला होता. काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं सांगत, जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तान हिंसा भडकावण्याचं काम करत असल्याचा आरोप केला होता. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राला लिहिलेल्या पत्रात राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा आधार घेतल्याचं वृत्त होतं. त्यामुळे राहुल गांधींनी ट्वीट केल्याचं म्हटलं जात आहे. काश्मीरमधील परिस्थितीवरुन सरकारवर हल्ला दरम्यान, मागील आठवड्यात काश्मीरमधील परिस्थितीवरुन राहुल गांधी यांनी सरकारवर हल्ला करत, विरोधक आणि मीडियाला 'निष्ठुर प्रशासनाची' चव चाखायला मिळाल्याचं म्हटलं. राहुल गांधींचा इशारा हा त्यांच्या नेतृत्त्वाखालील विरोधकांच्या शिष्टमंडळाला काश्मीर खोऱ्यात जाण्यापासून रोखण्याकडे होता. तसंच या शिष्टमंडळासोबत गेलेल्या पत्रकारांनाही श्रीनगर विमातळाबाहेर जाण्यापासून मज्जाव घालण्यात आला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM :16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaSharad Pawar Full PC : अजित पवारांच्या‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार म्हणाले...Ajit Pawar Speech Baramati : प्रतिभाकाकीना विचारणार, नातवाचा पुळका का? दादांचा हल्ला9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
×
Embed widget