(Source: ECI/ABP News/ABP Majha)
येत्या 1 जूनपासून रोज 200 नॉन एसी ट्रेन धावणार, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची घोषणा
येत्या 1 जूनपासून सुरु होणाऱ्या या ट्रेनसाठी ऑनलाईन बुकिंग लवकरच सुरू होणार आहे. या ट्रेन वेळापत्रकानुसार चालवल्या जाणार असल्याची माहिती पियुष गोयल यांनी दिली आहे.
नवी दिल्ली : कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर देशभरातील विविध ठिकाणी अनेक नागरिक अडकले आहे. या सर्वांनासाठी दिलासादायक बातमी आहे. येत्या 1 जूनपासून रोज 200 नॉन एसी ट्रेन धावणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी 'ट्विटरवरून दिली आहे.
येत्या 1 जूनपासून सुरु होणाऱ्या या ट्रेनसाठी ऑनलाईन बुकिंग लवकरच सुरू होणार आहे. या ट्रेन वेळापत्रकानुसार चालवल्या जाणार आहेत, याबाबतचीही माहिती लवकरच दिली जाईल, असं पियुष गोयल यांनी सांगितलं. जवळच्या मोठ्या रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी कामगारांना मदत करावी. कामगारांचं रजिस्ट्रेशन करुन त्याची यादी रेल्वेला द्यावी, असं आवाहन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राज्य सरकारांना केलं आहे.
राज्य सरकारों से आग्रह है कि श्रमिकों की सहायता करे तथा उन्हें नजदीकी मेनलाइन स्टेशन के पास रजिस्टर कर, लिस्ट रेलवे को दे, जिससे रेलवे श्रमिक स्पेशल ट्रेन चलाये। श्रमिकों से आग्रह है कि वो अपने स्थान पर रहें, बहुत जल्द भारतीय रेल उन्हें गंतव्य तक पहुंचा देगा।
— Piyush Goyal (@PiyushGoyal) May 19, 2020
मजुरांना आवाहन करताना रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं की, तुम्ही आहे तिथेच थांबा, तुम्हाला तुमच्या गावी पोहोचवलं जाईल. देशाभरात रोज शेकडो विशेष श्रमिक ट्रेन धावत आहेत. आतापर्यंत 1600 ट्रेनच्या माध्यमातून 21.5 लाख मजुरांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचवण्यात आलं आहे, अशी माहिती रेल्वेने दिली.
Bandra Station | Migrant Workers | मुंबईच्या वांद्रे स्थानक परिसरातील गर्दीवर पोलिसांकडून नियंत्रण