एक्स्प्लोर
Advertisement
केदारनाथ मंदिराचं प्रवेशद्वार आज खुलं होणार
देहराडून : महाप्रलयाचं महातांडव अंगावर झेलणारं केदारनाथ एखाद्या नववधूसारखं सजलं आहे. केदारनाथ धामचं कपाट अर्थात प्रवेशद्वार आज खुलं होणार आहे.
कपाट खुलं झाल्यानंतर सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथाचं दर्शन घेतील. यानंतर सर्वसामान्य भाविकांसाठी केदारनाथचं दर्शन खुलं होणार आहे. मंत्रोच्चार आणि परंपरेनुसार सकाळी 8.50 मिनिटांनी मंदिराचं प्रवेशद्वार खुलं होईल.
महाप्रलयाच्या तीन वर्षानंतर पहिल्यांदाच केदारनाथमध्ये एवढा मोठा जंगी सोहळा होत आहे. हजारो शिवभक्त केदारनाथ धामला पोहोचले असून प्रवेशद्वार खुलं होण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीदरम्यान काशी विश्वनाथ मंदिरात रुद्राभिषेक केला होता. त्याचप्रमाणे मोदी केदारनाथ मंदिरातही रुद्राभिषेक करणार आहेत.
ऊखी मठापासून बाबा केदारनाथ यांची पालखी काल मंदिरात पोहोचली. परंपरेनुसार सहा कुमाऊं रेजिमेंटच्या बॅण्डच्या तालावर बाबा केदारनाथांचं स्वागत करण्यात आलं. पंतप्रधान पोहोचल्यानंतर त्यांचंही या बॅण्डच्या तालावर स्वागत होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement