एक्स्प्लोर
सरकारी रुग्णालयं, पेट्रोल पंप, टोलला जुन्या नोटा स्वीकारण्यास मुदतवाढ
नवी दिल्ली : सरकारी रुग्णालयं, पेट्रोल पंप, दूधकेंद्र यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी एक हजार आणि पाचशे जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आणखी दहा दिवस म्हणजेच 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे.
सरकारी रुग्णालयं, पेट्रोल पंप, दूध केंद्र, टोल यासारख्या ठिकाणी जुन्या नोटा 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत स्वीकारण्यात येणार होत्या. मात्र ही मुदत वाढवण्यात आल्यामुळे अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री उशिरा अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राज्यभरात टोलनाक्यांवर 14 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत टोलवसुली केली जाणार नाही. मात्र ही मुदत वाढवण्याबाबतचा निर्णय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून घेण्यात येईल.
सरकारने पैसे काढण्याची आणि नोटा बदलण्याची मर्यादा वाढवली!
नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँक खात्यातून रक्कम काढण्यावर लावण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे दिवसाला 4 हजारांऐवजी साडेचार हजार रुपयांची रक्कम बदलता येणार आहे. एटीएममधून दोन हजारांऐवजी अडीच हजारांची रक्कम काढता येणार आहे. याशिवाय इतर बँक व्यवहारांवर लादण्यात आलेली मर्यादा देखील शिथील करण्यात आली आहे. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाने सर्व बँकांना आदेश दिले असून, आजपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.तातडीच्या उपचारावेळी रुग्णाकडून चेक स्वीकारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
चलन पुरवठा सुरळीत होईपर्यंत राज्यातील सर्व रुग्णालयांना रुग्णांकडून चेक स्वीकारण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याबाबत काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लक्ष ठेवलं जाणार आहे. अर्थमंत्रालयाचे बँकांना नवे आदेश :- एटीएममधून आता 2 हजार ऐवजी 2,500 रुपये काढण्याची मुभा
- बँक खात्यातून दिवसाला 4 हजाराऐवजी 4,500 रुपयांच्या नोटा बदलता येणार
- एटीएममधून दिवसाला 2 हजाराऐवजी 2,500 रुपये काढता येणार
- दिवसाला बँक खात्यातून 10 हजार रुपये काढण्याचे निर्बंध हटवले
- एका आठवड्यात बँक खात्यातून 20 हजाराऐवजी 24 हजार रुपये काढता येणार
- पेन्शनर्ससाठीची वार्षिक प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत 15 जानेवारीपर्यंत वाढवली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement