एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दहशतवादी जुनैद मट्टूला कंठस्नान, लष्कराचं मोठं यश
काश्मीर : लाखो रुपयांचं इनाम असलेला दहशतवादी जुनैद मट्टूला कंठस्नान घातल्याची माहिती नुकतीच समजते आहे. लष्कराकडून काढण्यात आलेल्या प्रेस रिलीजमध्ये जुनैद मट्टू चकमकीत ठार झाल्याचं म्हटलं आहे.
सकाळपासूनच लष्करानं अनंतनागमध्ये दहशतवाद्यांना घेरलं होतं. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनकडून देखील चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. याचवेळी जुनैद गट्टू आणि त्याचा एका साथीदाराला कंठस्नान घालण्यात आलं.
दुसरीकडे दक्षिण काश्मीरमध्ये पोलिसांवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती समजते आहे. यामध्ये आतापर्यंत पाच जवान जखमी झाले आहेत.
कोण होता जुनैद मट्टू जुनैद मट्टू हा लष्कर-ए-तोएबाचा दक्षिण काश्मीरमधील प्रमुख कुलगाममधील खुदवानी गावचा तो रहिवासी होता. तो ३ जून २०१५ मध्ये संघटनेत भरती झाला होता. जुनैद उच्च शिक्षित होता. गेल्यावर्षी दहशतवाद्यांच्या एका गटाने अनंतनाग पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. त्यावेळी जुनैद चर्चेत आला होता. जुनैदने जून २०१६ मध्ये अनंतनागमधील एका वर्दळीच्या बस स्थानकावर दिवसाढवळ्या २ पोलिसांची हत्या केली होती. त्यानंतर त्याच्यावर लाखो रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. अखेर आज त्याला कंठस्नान घालण्यात यश आलं.Two terrorists including Lashkar Commander Junaid Mattoo have been eliminated in the Kulgam encounter by Indian Army, SoG and CRPF. pic.twitter.com/ikCblNx3V4
— ANI (@ANI_news) June 16, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
शेत-शिवार
मुंबई
निवडणूक
Advertisement