एक्स्प्लोर
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता अनंतात विलीन
चेन्नई : तामिळी जनतेचा प्राण नव्हे तर श्वास असलेल्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मरिना बीचवर जयललिता यांचे राजकीय गुरु एमजीआर यांच्या समाधीशेजारीच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले.
यावेळी लाखोंच्या संख्येने तमिळी जनता उपस्थित होती. मरिना बीचवर जिकडं बघावं तिकडं शोकाकूल जनतेशिवाय काहीही दिसत नव्हतं.
गेल्या महिन्यापासून जयललिता फुफ्फुसाच्या विकारामुळं अपोलो रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र, सोमवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर तामिळनाडू राज्य शोकात बुडालं.
जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूमध्ये 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे पुढचे 7 दिवस शाळा-कॉलेज आणि इतर व्यवहार बंद राहणार आहेत.
पन्नीरसेल्वम मुख्यमंत्रीपदी
जयललिता यांच्या निधनाची घोषणा होताच पनीरसेल्वम यांची तामिळनाडूच्या नव्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली.
एवढंच नाही तर मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधीही उरकून घेण्यात आला.. त्यामुळं जयललिता यांच्यानंतर ओ.पनीरसेल्वम हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. पनीरसेल्वम हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत.
रविवारी रात्री जयललिता यांनी हृदयविकाराचा झटका आल्यापासूनच त्यांच्या प्रकृती ढासळत होती..त्यामुळे रविवारी रात्री अपोलो रुग्णालयातच तामिळनाडू मंत्रिमंडळाची आपात्कालीन बैठकही घेण्यात आली होती. त्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चाही करण्यात आली होती.
पनीरसेल्वम हे जयललिता यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. जयललिता यांना जेव्हा तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. तेव्हा मुख्यमंत्रीपदी पनीरसेल्वम यांची निवड करण्यात आली होती. पण शपथविधीच्या कार्यक्रमात जयललितांच्या अनुपस्थितीमुळे त्यांना भर शपथविधी कार्यक्रमात अश्रूही अनावर झाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement