एक्स्प्लोर
'लष्कर-ए-तोयबा'चा कमांडर अयुब लेलहारीला कंठस्नान
एका घरात तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरु केली.
नवी दिल्ली : भारतीय सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाचा कुख्यात दहशतवादी अयुब लेलहारीचा खात्मा केला. जम्मू काश्मीरमधील पुलवामातील काकपोरा परिसरात झालेल्या चकमकीत लेलहारीला कंठस्नान घालण्यात आलं.
अयुब लाहिरी हा लष्कर-ए-तोयबाचा विभागीय कमांडर होता. एका घरात तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरु केली. या शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु करण्यात आला.
भारतीय सुरक्षा दलाकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. या चकमकीत एक जवानही जखमी झाल्याची माहिती आहे.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, गावात दहशतवादी आल्याची माहिती मिळाल्यानंतर 47 राष्ट्रीय रायफल्सच्या नेतृत्वाखाली सेना आणि राज्य पोलिसांच्या विशेष पथकानं ही मोहीम आखली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement