एक्स्प्लोर

Tej Pratap Yadav : विवाहबाह्य संबंधाची कबुली देणं महागात, पक्षातून आणि कुटुंबातून तेजप्रतापची हकालपट्टी; लालू प्रसाद यादवांचा मोठा निर्णय

Lalu Prasad Yadav : तेज प्रताप यादवचे अनुष्कासोबत 12 वर्षांपासून संबंध होते तर मग त्याने 2018 मध्ये ऐश्वर्यासोबत लग्न का केलं होतं असा प्रश्न विचारत विरोधकांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर टीका केली.

Tej Pratap Yadav Anushka Yadav Relationship : बिहारची विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील कलह समोर आला आहे. आपल्या विवाहबाह्य रिलेशनशिपची जाहीर कबुली देणाऱ्या तेजप्रताप यादवची लालूंनी पक्षातून तसेच कुटुंबातून हकालपट्टी केली आहे. मोठ्या मुलाचे वर्तन हे बेजबाबदार आणि कौटुंबिक मूल्यांना धरुन नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादवने अनुष्का यादवसोबत असलेल्या 12 वर्षांच्या संबंधाची जाहीर कबुली दिली होती. काही वेळातच ती पोस्ट डिलिटही केली. पण त्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी तेजप्रतापला कुटुंबातून आणि पक्षातून काढून टाकलं.  एक्सवर पोस्ट करत लालू प्रसाद यादव यांनी यासंदर्भातील माहिती दिली. मुलगा तेजप्रताप यादवचं वर्तन बेजबाबदार असल्याचा ठपका ठेवत लालू प्रसाद यांनी त्याला सहा वर्षांसाठी बाहेरचा रस्ता दाखवला. 

Lalu Prasad Yadav Tweet : काय म्हणाले लालू प्रसाद यादव?

खाजगी जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्याने सामाजिक न्यायासाठीचा आपला सामूहिक संघर्ष कमकुवत होतो. मोठ्या मुलाचे कृत्य, सार्वजनिक वर्तन आणि बेजबाबदार वर्तन आपल्या कौटुंबिक मूल्ये आणि परंपरांनुसार नाही. म्हणून मी त्याला पक्ष आणि कुटुंबापासून दूर ठेवतो. आतापासून त्याची पक्षात आणि कुटुंबात कोणत्याही प्रकारची भूमिका राहणार नाही. त्याला पक्षातून 6 वर्षांसाठी काढून टाकण्यात आले आहे.

तो स्वतः त्याच्या वैयक्तिक जीवनातील चांगले-वाईट आणि गुण-दोष पाहण्यास सक्षम आहे. त्याच्याशी ज्यांचे संबंध आहेत त्यांनी स्वतःच्या विवेकबुद्धीने निर्णय घ्यावेत. मी नेहमीच सार्वजनिक जीवनात सन्मानाने जगलो आहे. कुटुंबातील आज्ञाधारक सदस्यांनी सार्वजनिक जीवनात ही कल्पना स्वीकारली आहे आणि तिचे पालन केले आहे.

 

Tej Pratap Yadav Anushka Yadav Relationship : निवडणुकीच्या तोंडावर लालूंसाठी धक्का

बिहार विधानसभेच्या निवडणुकीला अवघे सहा महिने बाकी आहेत. ही निवडणूक एनडीएसाठी, नितीशकुमारांसाठी आणि राजदच्या लालूप्रसाद यादव यांच्यासाठी अतिमहत्वाची आहे. अशा काळात राजदला एक मोठा हादरा बसला. लालूंच्या थोरल्या मुलाने, तेजप्रतापने आपल्या विवाहबाह्य संबंधांची थेट सोशल मीडियावर फोटो टाकत कबुली दिली. 

या प्रकरणावरुन एवढा गदारोळ झाला कारण तेजप्रताप यादवचे सात वर्षांपूर्वी ऐश्वर्यासोबत लग्न झालं आहे. त्याचे 12 वर्षांपासून अनुष्कासोबत संबंध होते तर ऐश्वर्यासोबत लग्न का केलं हा प्रश्न विचारला जात आहे. बिहार भाजपनेही लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली होती. अखेर लालूंनी तेजप्रताप यादवची पक्षातून हकालपट्टी केलीच, सोबत कुटुंबातून बेदखलही केलं. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: प्रेयसीवरती संशय; आधी खाऊ घातलं नंतर जीव घेतला अन् मृतदेहासोबत वारंवार..., मुंबईत जाऊन तिच्या आत्म्यासोबत बोलण्याचा प्रयत्न, घटनेनं इंदौर हादरलं
प्रेयसीवरती संशय; आधी खाऊ घातलं नंतर जीव घेतला अन् मृतदेहासोबत वारंवार..., मुंबईत जाऊन तिच्या आत्म्यासोबत बोलण्याचा प्रयत्न, घटनेनं इंदौर हादरलं
Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अपघातावर पार्थ आणि सुनेत्रा पवारांचं म्हणणं काय?; रोहित पवारांनी पहिल्यांदाच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजितदादांच्या अपघातावर पार्थ आणि सुनेत्रा पवारांचं म्हणणं काय?; रोहित पवारांनी पहिल्यांदाच सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
Ajit Pawar Plane Crash: दोन्ही रेकॉर्डरचे नुकसान, पण L3 संभाषणाचा डेटा मिळाला; अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच अधिकृत स्पष्टीकरण, नेमकं काय काय म्हटलंय?
दोन्ही रेकॉर्डरचे नुकसान, पण L3 संभाषणाचा डेटा मिळाला; अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच अधिकृत स्पष्टीकरण, नेमकं काय काय म्हटलंय?
Ajit Pawar Plane Crash Black Box मोठी बातमी: ब्लॅक बॉक्सवर आगीचा दुष्परिणाम, अजितदादांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सबाबत धक्कादायक माहिती; आता पुढे काय?
मोठी बातमी: ब्लॅक बॉक्सवर आगीचा दुष्परिणाम, अजितदादांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सबाबत धक्कादायक माहिती; आता पुढे काय?

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar and Ajit Pawar: राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेते शरद पवारांना विरोध करतायत, आमदारांनाही धमकावलं? रोहित पवारांचा खळबळनजक दावा
राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेत्यांचा शरद पवारांना विरोध, आमदारांना धमकावलं? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला
इमरान खान यांच्यासाठी एकवटले माजी कर्णधार, कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह 14 दिग्गजांचं पाकिस्तान सरकारला पत्र
इमरान खान यांच्यासाठी कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह 14 दिग्गजांचं पाकिस्तान सरकारला पत्र...
'ठाणे की रिक्षा'वाला कुणाला कामरा विधानभवनात; सोबत सुषमा अंधारे अन् वकील, अंगावर लक्षवेधी टी-शर्ट
'ठाणे की रिक्षा'वाला कुणाला कामरा विधानभवनात; सोबत सुषमा अंधारे अन् वकील, अंगावर लक्षवेधी टी-शर्ट
जुन्या चित्रपटस्टाईलने मामा भाच्याचे अपहरण, राजस्थानहून पार्सल आल्याचा बनाव; 3 तासांत आरोपी गजाआड
जुन्या चित्रपटस्टाईलने मामा भाच्याचे अपहरण, राजस्थानहून पार्सल आल्याचा बनाव; 3 तासांत आरोपी गजाआड
Rohit Pawar: राज्य सरकारने अजितदादा अन् माझी केस थांबवायला सांगितली, पण ईडीला दिल्लीतून सूचना आल्या अन्... रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
राज्य सरकारने अजितदादा अन् माझी केस थांबवायला सांगितली, पण ईडीला दिल्लीतून सूचना आल्या अन्... रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
Akola Crime News: 24 वर्षीय नराधमाचं 8 वर्षांच्या चिमुकलीसोबत नको ते कृत्य, मुलीने बापाला आपबिती सांगितली अन्...; अकोल्यातील संतापजनक घटना
24 वर्षीय नराधमाचं 8 वर्षांच्या चिमुकलीसोबत नको ते कृत्य, मुलीने बापाला आपबिती सांगितली अन्...; अकोल्यातील संतापजनक घटना
Embed widget