Tej Pratap Yadav : लालूंचा मुलगा तेज प्रताप यादवची दुसऱ्या रिलेशनशिपची कबुली, अुनुष्कासोबत फोटो शेअर, नंतर पोस्ट डिलिट
Tej Pratap Yadav Anushka Yadav Relationship : पहिल्या पत्नीसोबत घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू असतानाच तेज प्रताप यादवने दुसऱ्या रिलेशनशिपची कबुली दिली आहे.

नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव याने त्याच्या नव्या रिलेशनशिपची घोषणा केली, फेसबुकवर पोस्ट लिहून त्याने अनुष्का यादवसोबत (Anushka Yadav) 12 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं. पण काही वेळातच ती पोस्ट डिलिटही केली. त्या पोस्टचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
तेज प्रताप यादव हा लालू प्रसाद यादव यांचा लहान मुलगा असून त्याने बिहारमध्ये मंत्रिपदही भूषवले आहे. त्याचे या आधीच लग्नही झाले असून ते आता मोडण्याच्या वाटेवर आहे. त्यातच तेज प्रताप यादवने दुसऱ्या नात्याची कबुली दिली आहे.
Tej Pratap Yadav Facebook Post : सोशल मीडियावर पोस्ट
तेज प्रताप यादव याने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते की, अनुष्का यादव आणि मी गेल्या 12 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि एकमेकांवर प्रेम करतो. आम्ही गेल्या 12 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत. बऱ्याच दिवसांपासून हे सर्वांना सांगायची इच्छा होती, पण कसे सांगावे हे समजत नव्हते. मी बऱ्याच दिवसांपासून हे तुम्हा सर्वांना सांगू इच्छित होतो, पण ते कसे सांगावे हे मला समजत नव्हते. म्हणून आज या पोस्टच्या माध्यमातून मी माझ्या मनातील भावना तुमच्या सर्वांसोबत शेअर करत आहे. मला आशा आहे की माझ्या भावना तुम्ही समजून घ्याल."

Tej Pratap Yadav wife : घटस्फोट खटला न्यायालयात
याआधी तेज प्रताप यादव यांचे 2018 मध्ये लग्न झाले होते. परंतु काही महिन्यांनंतर पत्नी ऐश्वर्या आणि तेज प्रताप यांच्यातील मतभेद टोकाला गेले आणि वादामुळे त्यांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला. या दोघांच्यातील घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे. मात्र आता नवीन नात्यानंतर तेज प्रताप यादव आणि अनुष्का यादव प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत.
Tej Pratap Yadav Anushka Yadav Relationship : लग्नाची चर्चा
राजद नेता तेज प्रताप यादव याने त्यांची फेसबुक पोस्ट डिलीट केली असली तरी, त्याच्या पोस्टचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाला. सोशल मीडियावर त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. तेज प्रताप यादव भविष्यात अनुष्का यादवशी लग्न करू करणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
ही बातमी वाचा:
























