एक्स्प्लोर
Advertisement
संघाचा स्वयंसेवक असल्याचा मला अभिमान : लालकृष्ण आडवाणी
माउंट आबू : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी संघाचा स्वयंसेवक असल्याबद्दल, आपल्याला अभिमान असल्याचं वक्तव्य केलं आहे. ब्रम्हकुमारी या अध्यात्मिक संघटनेच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात लालकृष्ण आडवाणी बोलत होते.
आडवाणी म्हणाले की, ''राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मला शिस्त आणि प्रमाणिकपणासोबत अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. लहानपणापासूनच मी या संघटनेचा स्वयंसेवक असल्याबद्दल मला सदैव अभिमान वाटतो.''
देशभरातील अनेक संघटनांपैकी रा.स्व.संघ एक असल्याचं सांगून आडवाणी पुढे म्हणाले की, या संघटनेमुळे माझी वैचारिक बैठक पक्की झाली. त्यामुळे आपण आपल्या सिद्धांताशी कधीही तडजोड केली नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी भाजपवरील आपली पकड मजबूत केल्यापासून भाजपचे ज्येष्ठ नेते लालाकृष्ण आडवाणी दुर्लक्षित आहेत. 2014 मधील लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या यशानंतर आडवाणींना संसदीय बोर्डापासून वेगळं करुन मार्गदर्शक मंडळात त्यांना स्थान देण्यात आलं.
आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून संभावित नावांमध्ये लालकृष्ण आडवाणी यांच्याही नावाचीही चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रपतीपदासाठी आपली दावेदारी भक्कम करण्याच्या दृष्टीकोनातून आडवाणींचे हे वक्तव्य असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
करमणूक
शेत-शिवार
बातम्या
Advertisement