Kuwait : कुवेतमध्ये काम करणाऱ्या भारतीय कामगारांना धक्का, 48 हजार मजुरांना देश सोडावा लागला
रिपोर्टनुसार, सुमारे 48,000 भारतीय कामगारांना कुवेत सोडावे लागले आणि ते बेरोजगार झाले आहेत.
Kuwait Indian Workers Left Job : कुवेतमध्ये (Kuwait) काम करणारे अनेक भारतीय बेरोजगार (Unemployed) झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2021 च्या पहिल्या 9 महिन्यांत तब्बल 1 लाख 68 हजार स्थलांतरित कामगारांना कुवेत सोडावे लागले. कुवेत सोडून जाणारे बहुतांश कामगार भारतीय आहेत. ज्यांना कामावरून माघार घ्यावी लागली आहे. त्यात खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील कामगारांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
कुवेतमधील भारतीय कामगारांना धक्का
कोरोना महामारीमुळे (Coronavirus) संपूर्ण जगात दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान, या महामारीचा रोजगारावरही परिणाम झाला आहे. कोरोनाच्या कहरात इतर देशांमध्ये काम करणाऱ्या भारतीय कामगारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 60 हजार 400 घरगुती कामगार आणि सुमारे 1 लाख 7 हजार 900 मजूर जे खाजगी आणि सरकारी क्षेत्रात काम करत होते. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, कुवेतमध्ये एकूण घरगुती कामगारांच्या संख्येत 9 टक्क्यांनी घट झाली आहे. याचे कारण 60 हजार 400 कामगारांनी लेबर मार्केट सोडल्याचे सांगितले जात आहे. 2021 च्या सुरुवातीच्या महिन्यांत कुवेतमधील एकूण कामगारांची संख्या 6 लाख 68 हजारांहून अधिक होती. त्याच सप्टेंबर 2021 मध्ये कामगारांची संख्या कमी होऊन ती सुमारे 6 लाख 8 हजारांवर पोहोचली.
48 हजार भारतीय कामगारांना कुवेत सोडावे लागले
अहवालानुसार, सुमारे 48,000 भारतीय कामगारांना कुवेत सोडावे लागले आणि ते बेरोजगार झाले आहेत. आता कुवेतमध्ये काम करणाऱ्या भारतीयांची संख्या सुमारे 4 लाख 51 हजारांवर पोहोचली आहे. तर यापूर्वी ही संख्या 4 लाख 99 हजारांहून अधिक होती. याशिवाय कुवेतमध्ये काम करणाऱ्या इजिप्त, फिलिपाइन्स, पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशातील मजुरांच्या संख्येतही घट झाली आहे. कुवेतमध्ये नोकरी करणाऱ्या परदेशी कामगारांऐवजी आपल्या नागरिकांना प्राधान्य देत असल्याचे सांगण्यात येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Hijab Controversy : हिजाब प्रकरणाचे राज्यात पडसाद! पुण्यात राष्ट्रवादीचं भाजपविरोधात आंदोलन तर हिंदू महासभेची रॅली, गृहमंत्री म्हणाले...
- Hijab Controversy : कर्नाटकमधील हिजाबबंदीच्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न; माकपचा आरोप
-
Hijab Controversy: RSS च्या मुस्लिम आघाडीकडून कर्नाटकमधील 'त्या' मुलीचे कौतुक म्हणाले....