एक्स्प्लोर
दहशतवाद्यांची बिर्याणी पार्टी, व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय?
नवी दिल्ली : एकीकडे दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोठं सर्च ऑपरेशन भारतीय सैन्याने हाती घेतलं आहे, तर दुसरीकडे दहशतवाद्यांच्या बिर्याणी पार्टीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दहशतवादी जंगलात बसून अगदी आरामात बिर्याणीवर ताव मारताना या व्हिडीओत दिसतात.
आता प्रश्न असे उपस्थित होत आहेत की, व्हिडीओ जुना आहे की नवीन? आणि कोणत्या हेतूने हा व्हिडीओ व्हायरल केला गेलाय का?
व्हिडीओमध्ये काय दिसत आहे?
37 सेकंदांच्या या व्हिडीओच्या सुरुवातीला एक दहशतवादी आरामात बसून बिर्याणीवर ताव मारताना दिसत आहे, त्याच्या डोळ्यांवर काळा चष्मा आहे. व्हिडीओ थोडा पुढे गेल्यानंतर, दुसरा दहशतवादी बोटं चाटताना दिसतो. यांशिवाय आणखी दोन दहशतवादीही बिर्याणीवर ताव मारताना दिसतात.
टिफीनमध्ये खूप सारं मटन ठेवलेलं पाहायलं मिळतं. कोल्डड्रिंकच्या बाटल्याही दिसतात. चार दहशतवादी खाताना, तर पाचवा व्हिडीओ शूट करत आहे आणि सहावा इसम या पाचही जणांना कॅमेऱ्यात कैद करत आहे.
व्हिडीओमागचं सत्य काय?
एबीपी न्यूजने व्हायरल व्हिडीओमागचं सत्य जाणून घेण्यासाठी सैन्य दलातील सूत्रांशी संपर्क साधला. त्यानंतर अशी माहिती समोर आली की, हा व्हिडीओ दक्षिण काश्मीरमधील बागेतील आहे. काश्मीरच्या शोपियां-कुलगाम सीमेवरील हा परिसर आहे. हा व्हायरल व्हिडीओ लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांचा आहे.
दहशतवाद्यांना जेवण कुठून मिळतं?
दहशतवादी जी बिर्याणी पार्टी करत आहेत, ती बिर्याणी त्याच परिसरात राहणाऱ्या कुटंबाने दिली आहे. हे लोक दहशतवाद्यांसाठी ओव्हर ग्राऊंड वर्कर्स म्हणून काम करतात. म्हणजेच सर्वसाधारण काश्मिरी लोकांप्रमाणेच हे लोक राहतात. मात्र, दहशतवाद्यांना जेवण वगैरे बनवून देण्याचं काम करतात.
दहशतवाद्यांपर्यंत जेवण कसं पोहोचवलं जातं?
दहशतवाद्यांपर्यंत जेवण पोहोचवण्याची एक खास प्रक्रिया आहे. जेवण तयार झाल्यानंतर दहशतवादी अशा मुलांना मशिदीजवळ पाठवतात, जे दहशतवादी नाहीत. ही मुलं जेवण घेऊन दुसऱ्या मुलांकडे देतात. त्यानंतर ते दहशतवाद्यांपर्यंत पोहोचतं. पोलिस किंवा कोणतीही सुरक्षा यंत्रणा आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून दहशतवादी अशाप्रकारे किचकट प्रक्रियेतून जेवण मागवतात.
सैन्याला घाबरुन जंगलात लपतात दहशतवादी!
जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याने 15 वर्षांनंतर कॉर्डन एंड सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. या ऑपरेशनच्या माध्यमातून प्रत्येक घर तपासलं जाणार आहे. जेणेकरुन दहशतवादी बंदुकीचा धाक दाखवून लपला असल्यास त्याला पकडता येईल.
सैन्य दलातील सूत्रांच्या माहितीनुसार, कॉर्डन एंड सर्च ऑपरेशन सुरु झाल्यानंतर दहशतवादी जंगलात पळाले असून, तिकडे लपले आहेत आणि तिथेच त्यांचं खाणं-पिणं होत आहे.
एबीपी न्यूजच्या पडताळणीत दहशतवाद्यांच्या कोल्डड्रिंक-बिर्याणीच्या पार्टीचा व्हिडीओ खरा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement