एक्स्प्लोर

What is ISIS module : संपूर्ण देशाला विळखा घातलेलं ISIS मॉड्यूल आहे, तरी काय ?

What is ISIS module : संपूर्ण देशाला विळखा घातलेल्या ISIS मॉड्यूल विरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेबरोबर देशातील  तपास यंत्रणांनी बिमोड करण्यासाठी विडा उचलला असला, तरी त्यामध्ये पूर्णत: यश आलेलं नाही.

What is ISIS module : संपूर्ण देशाला विळखा घातलेल्या ISIS मॉड्यूल विरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेबरोबर देशातील  तपास यंत्रणांनी बिमोड करण्यासाठी विडा उचलला असला, तरी त्यामध्ये पूर्णत: यश आलेलं नाही.  देशविघातक ISIS मॉड्यूल विरोधात आजही एनआयएने (NIA) देशभरात छापेमारी करताना  देशातील 6 राज्यांमध्ये 13 संशयितांच्या घरांची झाडाझडती घेतली आहे. यामध्ये राज्यातील कोल्हापूर आणि नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे.

मध्य प्रदेशातील भोपाळ आणि रायसेन, गुजरातमधील भरूच, सुरत, नवसारी आणि अहमदाबाद, बिहारमधील अररिया, कर्नाटकातील भटकळ आणि तुमकूरमध्ये छापेमारी केली. उत्तर प्रदेशातील देवबंद जिल्ह्यांमध्ये ISIS च्या कारवायांशी संबंधित छापेमारी करण्यात आली. सहा राज्यामध्ये केलेल्या  या कारवाईत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, साहित्य जप्त करण्यात आले आहेत. ISIS मॉड्यूल प्रकरणाच्या तपासात 6 राज्यांमध्ये अनेक ठिकाणी शोध घेतला जात आहे.

पहिल्यांदा ISIS चा उदय कसा झाला हे समजून घेऊ 

इस्लामिक स्टेट, किंवा ISIS, ही एक अतिरेकी संघटना आहे जी 2014 मध्ये अल कायदाची शाखा म्हणून उदयास आली. तिने त्वरीत इराक आणि सीरियाच्या मोठ्या भागावर ताबा मिळवत विजयी निशाण म्हणून आपला काळा झेंडा फडकावला आणि खलिफत निर्माण करण्याची घोषणा केली आणि कठोर इस्लामिक शासन लागू केले. 

या गटाला कधीकधी ISIL म्हणजेच इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट किंवा त्याच्या अरबी भाषेत Daesh देखील संबोधले जाते. यामध्ये मुख्यत्वे इराक आणि सीरियातील अतिरेकी सामील झाले आहेत. परंतु मुस्लिम देश आणि युरोपमधील हजारो पाठिराखे तयार करण्यात त्यांना यश आले आहे. 

शिरच्छेद, गुलाम म्हणून घेणे, संगीत आणि धूम्रपान यासारख्या "अ-इस्लामिक" वर्तनावर बंदी यासह ते इतके क्रूर आहेत, की ते अल कायदाने देखील नाकारले होते.

इस्लामिक स्टेट कशासाठी लढत आहे?

अतिरेक्यांचे ध्येय अति-पुराणमतवादी खिलाफत आहे जी शरियत किंवा इस्लामिक कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करते.

इस्लामिक स्टेट कोणी सुरू केले आणि त्याचे नेतृत्व केले?

ISIS ची स्थापना अबू बकर अल-बगदादी या इराकीने केली होती. त्याने प्रथम इराकमधील अल कायदाचे नेतृत्व केले आणि त्यानंतर त्याची व्याप्ती वाढवत नेली. या गटाने एप्रिल 2013 मध्ये नाव बदलत इराक आणि सीरियामध्ये खलिफत स्थापन करण्याच्या त्याच्या व्यापक महत्त्वाकांक्षेचे संकेत दिले.

मे 2017 मध्ये एका हवाई हल्ल्यात अल-बगदादी मारला गेला असावा, असा कयाश रशियाचा आहे. तथापि, याची पुष्टी कधीही झालेली नाही. या गटाच्या बाह्य ऑपरेशन्सचा म्होरक्या अबू मुहम्मद अल-अदनानी FBI च्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये आहेत कारण पाश्चिमात्यांना हानी पोहोचवण्याची शक्यता आहे.

आता ISIS मॉड्यूल आहे, तरी काय? समजून घेऊ

ISIS छुपे पाठिराखे आणि अतिरेकी कारवायांमध्ये गुंतलेल्या अनेकांच्या मुसक्या देशातील तपास यंत्रणांनी आवळल्या असल्या, तरी त्याचा पूर्णपणे बिमोड झालेला नाही. देशातील मुस्लीम युवकांना इतर धर्मींयाविरुद्ध भडकवणे हा त्यांचा मूळ हेतू आहे. त्यांच्यामध्ये सनातनी प्रवृत्ती रुजवण्याचा एककलमी कार्यक्रमही केला जातो. तसेच धर्मांध युवकांना isis मध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित सुद्धा करण्याचे काम केले जाते. त्याचबरोबर isisच्या टेरर फंडींगसाठी निधी गोळा करणे, सोशल मीडिया, प्रामुख्याने व्हॅट्सअॅपद्वारे कट्टरतावादी, दहशतवादी विचारधारेचे, isis चे समर्थन करणारे संदेश युवकांमध्ये प्रसारित करणे ISIS मॉड्यूलच्या माध्यमातून केले जाते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget