(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ISIS Module Case : NIA कडून कोल्हापूर, नांदेडमध्ये छापेमारी; ISIS संबंधित प्रकरणात मोठी कारवाई
राष्ट्रीय तपास यंत्रणेने आज महाराष्ट्रातल्या कोल्हापूर आणि नांदेडसह देशांतल्या 13 ठिकाणी छापे टाकले आहेत. सहा राज्यातल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, साहित्य जप्त करण्यात आले आहे
ISIS Module Case : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) आज ISIS मॉड्यूल प्रकरणात देशातील 6 राज्यांमध्ये 13 संशयितांच्या घरांची झाडाझडती घेतली आहे. यामध्ये राज्यातील कोल्हापूर आणि नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे.
एनआयएने मोठी कारवाई करताना मध्य प्रदेशातील भोपाळ आणि रायसेन, गुजरातमधील भरूच, सुरत, नवसारी आणि अहमदाबाद, बिहारमधील अररिया, कर्नाटकातील भटकळ आणि तुमकूरमध्ये छापेमारी केली. उत्तर प्रदेशातील देवबंद जिल्ह्यांमध्ये ISIS च्या कारवायांशी संबंधित छापेमारी करण्यात आली. सहा राज्यामध्ये केलेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, साहित्य जप्त करण्यात आले आहेत. ISIS मॉड्यूल प्रकरणाच्या तपासात 6 राज्यांमध्ये अनेक ठिकाणी शोध घेतला जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरीमध्ये NIA चा छापा
दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्याती हुपरीमध्ये एनआयएने कारवाई केली आहे. इर्शाद शौकत शेख आणि त्याचा भाऊ अल्ताब शेख या दोघांना ताब्यात घेतलं आहे. इर्शाद हा लबैक इमदाद फौंडेशनचा अध्यक्ष म्हणून काम पाहतो. एनआयएने ही कारवाई पहाटेच्या सुमारास केली आहे.
स्थानिक पोलिस कारवाईबाबत अनभिज्ञ
दहा मिनिटांसाठी घेवून जातो अस सांगून दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती आता समोर आली आहे. याबाबत स्थानिक पोलिसाना कारवाई बाबत कोणतीही माहिती नसल्याने कारवाईबाबत गुप्तता पाळण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Aaditya Thackeray in Kolhapur : आदित्य ठाकरे उद्या कोल्हापुरात, बंडखोरांच्या मतदारसंघात सभा घेणार
- Kolhapur Crime : निवडणुकीच्या तोंडावर परप्रांतीय आरोपीकडून तब्बल 23 धारदार तलवारी जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
- Dhananjay Mahadik : धनंजय महाडिकांनी कामाची यादी वाचत गोकुळ, केडीसीचा विषय काढला, सतेज पाटलांना थेट पाईपलाईन कामावरून टोला!