एक्स्प्लोर

Kerala Accident : गुगल मॅपनं घात केला, थेट नदीत बुडाली कार; दोन डॉक्टरांचा अपघाती मृत्यू

Kerala Two Doctors Death : गूगल मॅपवर विश्वास ठेवून मुसळधार पावसात गाडी चालवल्याने कार नदीत बुडाली. यामुळे दोन डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.

Google Map Misguided Car : सध्या तंत्रज्ञानावर (Technology) आपण खूपच अवलंबून आहोत. पण, या तंत्रज्ञानावर डोळे बंद करु विश्वास ठेवण्याची चूक करू नका. तंत्रज्ञानावर विश्वास ठेवणं दोघांना महागात पडलं असून यामुळे त्यांचा जीव गेला आहे. गुगल मॅपमुळे (Google Map) रस्ता चुकल्याने नदीत बुडून कारचा अपघात झाला. केरळमधील (Kerala News) कोच्ची (Kochi News) येथे ही घटना घडली आहे. गुगल मॅप (Google Map News) मुळे रस्ता चुकल्याने एक कार नदीत (Kerala Car Accident) बुडाली आणि या अपघाता दोन डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, ती जण जखमीही झाले आहेत. 

गुगल मॅप वापरणं जिव्हारी! 

कोच्चीजवळील गोथुरुथ येथील पेरियार नदी (Periyar River) मध्ये कार बुडाली आणि अपघात झाला. या अपघातात कारमधील दोन डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात झाला, तेव्हा मुसळधार पाऊस (Kerala Heavy Rain) सुरु होता आणि यावेळी कारचालक गूगल मॅपचा वापर करत होता. जोरदार पावसामुळे (Heavy Rain) कारचालकाला समोरचं काही दिसत नव्हतं. यानंतर तो गुगल मॅपने दाखवलेल्या मार्गाने पुढे गाडी चालवत राहिला आणि यावेळी कार थेट नदीत बुडून अपघात घडला.

थेट नदीत गेली कार, दोन डॉक्टरांचा मृत्यू

शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारात ही घटना घडल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात डॉ. अद्वैत (29 वर्ष) आणि  डॉ. अजमल (29 वर्ष) चा मृत्यू झाला आहे. हे दोघेही खासगी रुग्णालयात होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डॉ. अद्वैत गाडी चालवत होते आणि गुगप मॅपचा वापर करत होते. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, गोथुरुथमध्ये जोरदार पाऊस झाला, त्यामुळे दृश्यमानताही खूपच कमी होती. गाडी चालवणारा तरुण गुगल मॅपने दाखवलेल्या मार्गावरून जात होता. त्याला कार डाव्या वळणावर वळवायची होती, मात्र तो चुकून पुढे गेला आणि गाडी नदीत कोसळली.

कोचीहून कोडुंगल्लूरला परतताना अपघात

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने पोलिसांना फोन करून अपघाताची माहिती दिली. शनिवारी डॉ. अद्वैतचा वाढदिवस होता. कारमध्ये अद्वैतसह अन्य चार जण होते. हे पाचही जण कोचीहून कोडुंगल्लूरला परतत होते. हे लोक अद्वैतच्या वाढदिवसाला खरेदीसाठी गेले होते, अशी माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या इतर बातम्या :

Crime News : मैत्रिणीनेचं घातला लग्न मोडण्याचा घाट! नवरदेवाला अश्लील फोटो पाठवले, अन् मग...

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest in Kochi: कोचीमध्ये SIR विरोधात कॉकरोच पार्टीचा मोर्चा, जंतर मंतरसारखे आंदोलन; प्रकाश राज म्हणाले, 'हम लेकर रहेंगे आजादी'
कोचीमध्ये SIR विरोधात कॉकरोच पार्टीचा मोर्चा, जंतर मंतरसारखे आंदोलन; प्रकाश राज म्हणाले, 'हम लेकर रहेंगे आजादी'
भारतात दिवाळी, पाकिस्तानाचं मात्र दिवाळं! चार महिन्यांत पाकला मोठा फटका, आयाता वाढली तर निर्यात कमी झाली 
भारतात दिवाळी, पाकिस्तानाचं मात्र दिवाळं! चार महिन्यांत पाकला मोठा फटका, आयाता वाढली तर निर्यात कमी झाली 
विश्वास बसणार नाही पण सत्य आहे, फक्त झोपून महिलेने कमावले 10 लाख रुपये, मुंबईची जिनिया ठरली 'स्लीप चॅम्पियन' 
विश्वास बसणार नाही पण सत्य आहे, फक्त झोपून महिलेने कमावले 10 लाख रुपये, मुंबईची जिनिया ठरली 'स्लीप चॅम्पियन' 
Crime News: पत्नीसह सात जणांना संपवलं; प्लॅन रचला, फोन बंद केला अन् बायको सहलीला गेल्याचं सांगितलं, जावयाने संपूर्ण परिवाला संपवलं, भयानक कांड कसं आलं समोर?
पत्नीसह सात जणांना संपवलं; प्लॅन रचला, फोन बंद केला अन् बायको सहलीला गेल्याचं सांगितलं, जावयाने संपूर्ण परिवाला संपवलं, भयानक कांड कसं आलं समोर?

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest in Kochi: कोचीमध्ये SIR विरोधात कॉकरोच पार्टीचा मोर्चा, जंतर मंतरसारखे आंदोलन; प्रकाश राज म्हणाले, 'हम लेकर रहेंगे आजादी'
कोचीमध्ये SIR विरोधात कॉकरोच पार्टीचा मोर्चा, जंतर मंतरसारखे आंदोलन; प्रकाश राज म्हणाले, 'हम लेकर रहेंगे आजादी'
Gokul Election: मागच्या दारानं महायुतीचा गोकुळवर कब्जा, कोल्हापूरपासून बीडपर्यंत संतापाचा उद्रेक, पोस्टर्स लागली; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'साठी सोशल मीडियातून सुद्धा हुंकार भरला
मागच्या दारानं महायुतीचा गोकुळवर कब्जा, कोल्हापूरपासून बीडपर्यंत संतापाचा उद्रेक, पोस्टर्स लागली; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'साठी सोशल मीडियातून सुद्धा हुंकार भरला
Devendra Fadnavis: 'बंटी पाटील, हसन मुश्रीफ आणि कोरेंनी एकत्रित बसून आपापसात निर्णय केला, तर..' सीएम फडणवीसांची 'गोकुळ'वर थेट अन् मोठी प्रतिक्रिया
'बंटी पाटील, हसन मुश्रीफ आणि कोरेंनी एकत्रित बसून आपापसात निर्णय केला, तर..' सीएम फडणवीसांची 'गोकुळ'वर थेट अन् मोठी प्रतिक्रिया
Manoj Jarange : वैभव चव्हाणच्या परिवाराची मनोज जरांगेंनी घेतली भेट; एफआयआर कॉपी वाचली, म्हणाले, 'फोटो पाहिले, अंगावरती प्रचंड जखमा, मग हे घातपात असायला पाहिजे, जाणून-बुजून....'
वैभव चव्हाणच्या परिवाराची मनोज जरांगेंनी घेतली भेट; एफआयआर कॉपी वाचली, म्हणाले, 'फोटो पाहिले, अंगावरती प्रचंड जखमा, मग हे घातपात असायला पाहिजे, जाणून-बुजून....'
Kolhapur Crime News: गुरुजी, लग्न जुळवायचंय, ज्योतिषी मंदार रानडेंना बोलवलं, डोळ्यांत मिरची पूड फेकली, विळ्याने गळा कापला, ऊसाच्या शेतात संपवलं अन्...; कारणही आलं समोर
गुरुजी, लग्न जुळवायचंय, ज्योतिषी मंदार रानडेंना बोलवलं, डोळ्यांत मिरची पूड फेकली, विळ्याने गळा कापला, ऊसाच्या शेतात संपवलं अन्...; कारणही आलं समोर
Vikhroli Railway Station Accident: विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना, आयुष्याला वैतागलेला तरुण लोकल ट्रेनसमोर उभा राहिला, दुसरा प्रवासी धावत गेला अन् झटक्यात...
बँकेत 30 लाख ठेवीदारांचे पैसे अडकले, पॅराग्वेत थेट सत्तापालट,राष्ट्रपतींवर महाभियोग चालवत नजरकैदेत ठेवलं
बँकेत 30 लाख ठेवीदारांचे पैसे अडकले, पॅराग्वेत थेट सत्तापालट,राष्ट्रपतींवर महाभियोग चालवला
Maharashtra Board Exam 2027 Dates Announced: मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
Embed widget