एक्स्प्लोर

Kerala Air India Plane Crash | केरळ विमान दुर्घटनेसाठी असू शकतात 'ही' तीन मुख्य कारणं

केरळमधील कोझीकोड विमानतळावर झालेल्या अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु, अनेकांकडून अपघाताच्या कारणांबाबत अंदाज व्यक्त केले जात आहेत. त्यापैकी या अपघासाठी तीन कारणांची चर्चा होताना दिसत आहे.

मुंबई : दुबईहून केरळमध्ये येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान IX-1344 शुक्रवारी संध्याकाळी कोझीकोड विमानतळावर लँडिंग दरम्यान दुर्घटनाग्रस्त झालं. या अपघातात पायलटसह 19 जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. विमानात एकूण 191 प्रवाशी प्रवास करत होते, ज्यामध्ये 10 मुलांचा समावेश आहे. या अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु, अनेकांकडून अपघाताच्या कारणांबाबत अंदाज व्यक्त केले जात आहेत. त्यापैकी या अपघासाठी तीन कारणांची चर्चा होताना दिसत आहे. जाणून घेऊया या अपघातासाठी जबाबदार असणारी तीन कारणं...

1. टेबल टॉप रनवे

कोझीकोडच्या ज्या विमानतळावर हा अपघात झाला, तेथील रनवे हा टेबल टॉप रनवे आहे. साधारणपणे रनवेवर मध्यभागी देखील लाईट असते ज्याला सेंटर लाईट असं म्हटलं जातं. यामुळे रात्रीच्या वेळी लँडिंग करताना वैमानिकांना रनवेचा अंदाज येतो. परंतु, या रनवेवर सेंटर लाईट नव्हती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, टेबल टॉप रनवे म्हणजे काय? एखाद्या पठारावर हा रनवे असतो आणि हा रनवे जिथे सुरु होतो आणि जिथे संपतो अशा दोन्ही टोकांना दरीसारखा खोलगट भाग किंवा उतार असतो. याकारणामुळे कोझीकोडच्या विमानतळावर मोठी विमानं येत नसतं. पावसाळ्यात तर हा रनवे आणखी धोकादायक ठरतो. कारण, खराब वातावरणामुळे या रनवेवर विजिबलिटी फार कमी असते, ज्यामुळे अपघाताची शक्यता आणखी वाढते. गुरुवारपासूनच कोझीकोडमध्ये मुसळधार पाऊस सुरु होता. त्यामुळे असं म्हटलं जात आहे की, याच कारणामुळे एअर इंडियाचं विमान लँड करताना पुढे निघून गेलं आणि अपघात झाला.

पाहा व्हिडीओ : केरळ विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या 19वर; 170 प्रवासी बचावले

2. कोरोना संकट आणि योग्य ट्रेनिंग नसणं

प्रत्येक वैमानिकाची वर्षातून दोन वेळा ट्रेनिंग होते. या ट्रेनिंगमध्ये जे पायलट फिट असतात, त्यांनाच उड्डाणं करण्यासाठी परवानगी देण्यात येते. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ट्रेनिंग 30 सप्टेंबरपर्यंत कॅन्सल करण्यात आली आहे. याचाच अर्थ असा आहे की, जे वैमानिक विमान उडवण्यासाठी फिट नाहीत. ते देखील काम करत आहेत. त्यामुळे कोझीकोड विमान दुर्घटनेचं हेदेखील एक कारण असू शकतं.

3. मानसिक तणाव

अपघाताच्या एक दिवस अगोदर म्हणजेच, गुरुवारी वैमानिकांच्या वेतनात जवळपास 60 टक्के कपात करण्यात आली आहे. अशात असं असू शकतं की, मानसिक तणावामुळे हा अपघात घडला असले.

वरील तीनही कारणं केवळ अंदाज म्हणून सांगण्यात येत असून अपघाताचं खरं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या अपघाताचं रेस्कू ऑपरेशन पूर्ण झालं असून या अपघातात वैमानिकांसह 19 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. 171 जण बचावले.

महत्त्वाच्या बातम्या : 

Kerala Plane Crash | केरळ विमान अपघाताचं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण, 18 मृत, 170 बचावले, प्रत्यक्षदर्शी म्हणतात...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्सNarhari Zirwal : मंत्रालयाच्या गेटवरील प्रसंगावर नरहरी झिरवाळ यांचं स्पष्टीकरणUday Samant : मराठी भाषेला त्रास देणाऱ्यांना... उदय सामंतांचं भाषण Pune Vishwa Marathi SammelanGunaratna Sadavarte On Suresh Dhas भाजप नेत्यांनी सुरेश धसांना समज द्यावा, त्यांच्यावर हक्कभंग आणावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Dhananjay Munde: भगवानगड आणि नामदेवशास्त्रींच्या पाठिंब्यासारखी दुसरी ताकद नाही, नव्या आत्मविश्वासाने काम करेन: धनंजय मुंडे
माझ्या पाठिशी भगवानगड आणि न्यायाचार्यांची ताकद उभी राहिलेय, माझा आत्मविश्वास वाढलाय: धनंजय मुंडे
Accident : भरधाव बोलेरो पिकअपची आयशरला भीषण धडक, प्रवाशी अक्षरश: बाहेर फेकले गेले; 9 जणांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी
भरधाव बोलेरो पिकअपची आयशरला भीषण धडक, प्रवाशी अक्षरश: बाहेर फेकले गेले; 9 जणांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी
Embed widget