एक्स्प्लोर

Kerala Plane Crash | केरळ विमान अपघाताचं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण, 18 मृत, 170 बचावले, प्रत्यक्षदर्शी म्हणतात...

केरळ विमान दुर्घटनेचं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालं आहे. या अपघातात दोन पायलटसह 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 170 लोकांचा वाचवण्यात आलं आहे.यावेळी प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेले अनुभव अंगावर शहारे उभे करणारे आहेत.

कोझिकोड : केरळ विमान दुर्घटनेचं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालं आहे. या अपघातात दोन पायलटसह 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 170 लोकांचा वाचवण्यात आलं आहे. एअर इंडियाचं विमान (IX-1344) मध्ये 190 लोकं होती. ज्यात 174 प्रवाशी, 10 मुलं, 4 केबिन क्रू आणि 2 पायलट होते. अपघातातील सर्व जखमींना मल्लपुरम आणि कोझिकोड येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पावसामुळं  विमान कोझिकोड रनवेवरुन घसरलं आणि 35 फुट खाली कोसळलं. एअर इंडियाच्या IX-1344 या विमानाचे दोन तुकडे झाले. अचानक कोसळलं विमान आणि आरडाओरड सुरु झाली  दुबईवरुन येत असलेलं विमान अचानक दरीत कोसळलं आणि मोठा आवाज झाला. विमानात अडकलेल्या लोकांची आरडाओरड, अॅम्ब्युलेंसच्या आवाजाने परिसर दणाणला. भर पावसात हे रेस्क्यू ऑपरेशन सुरु झालं. स्थानीक नागरिकांसह, पोलिस आणि बचावदलाच्या कर्मचाऱ्यांनी दुर्घटनेत जखमींना विमानातून बाहेर काढत दवाखान्यात पोहोचवलं. Kerala Plane Crash | केरळ विमान अपघाताचं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण, 18 मृत, 170 बचावले, प्रत्यक्षदर्शी म्हणतात... Kerala Plane Crash | कॅप्टन दिपक साठेंनी गमावला जीव, महाराष्ट्राच्या सुपुत्राने जीवाची बाजी लावत वाचवले अनेक प्राण बचाव अभियानात सहभागी असलेल्या एका व्यक्तिने सांगितलं की, जखमी पायलटला विमानाचं कॉकपिट तोडून बाहेर काढलं. एका प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, मोठा आवाज ऐकून आम्ही विमानतळाकडे पळालो. लहान मुलांसह अनेक लोकं विमानात अडकलेली होती. काही लोकं सीटखाली अडकली होती. हे चित्र भयावह होतं. अनेकाचे हात-पाय तुटले होते. सगळीकडे रक्त दिसून येत होतं, असं त्यानं सांगितलं. Kerala Plane Crash | केरळमधील विमान दुर्घटना 'टेबलटॉप रनवे'मुळे झाल्याचा अंदाज; म्हणजे काय? मिळालेल्या माहितीनुसार दुबईहून कालीकत येथे येणारं एअर इंडियांचं विमान दुर्घटनाग्रस्त झालं. रनवेहून घसरुन पुढे हे विमान निघून गेलं, त्यामुळे ही दुर्घटना झाली आहे. एअर इंडियाचं विमान IX-1344 हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. घटना घडल्यानंतर विमान दरीत कोसळलं आणि विमानाचे दोन तुकडे झाले आहेत. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या माहितीनुसार, विमानात दोन पायलटसह सहा क्रू मेंबर्स होते. तर विमानात 191 प्रवाशी प्रवास करत होते, ज्यामध्ये 10 मुलांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. कोझिकोडमध्ये विमान अपघात झाल्याने मी दु:खी झालो आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावे. केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्याशी मी बोललो. अधिकारी घटनास्थळी आहेत, जखमींना सर्व मदत मिळत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget