एक्स्प्लोर
काश्मीरप्रश्न सोडवणारच, कोणतीही ताकद आपल्याला रोखू शकत नाही : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सध्या काश्मीर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान आज माध्यमांशी बोलताना सिंह म्हणाले की, "काश्मीर प्रातांतील सर्व समस्या सोडवल्या जातील. जगातील कोणतीही ताकद आता आपल्याला रोखू शकत नाही".
श्रीनगर : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सध्या काश्मीर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान आज माध्यमांशी बोलताना सिंह म्हणाले की, "काश्मीर प्रातांतील सर्व समस्या सोडवल्या जातील. जगातील कोणतीही ताकद आता आपल्याला रोखू शकत नाही".
संरक्षणमंत्री एवढ्यावरच थांबले नाहीत, ते म्हणाले की, "आम्हाला बातचित करुन प्रश्न सोडवायचे आहेत. जर कोणाला बातचित करुन प्रश्न सोडवायचे नसतील तर आम्हाला चांगलंच ठाऊक आहे की, हे प्रश्न कसे सोडवायचे असतात".
माध्यमांच्या प्रतिनिधींनी राजनाथ सिंहांना दहशतवादाबाबत प्रश्न विचारले. यावर सिंह म्हणाले की, "दहशतवादाचा प्रश्न सोडवण्यासाठी इंटरनॅशनल कम्युनिटी एकत्र येत आहे. त्यामुळे आता काश्मीरसह संपूर्ण जगाला दहशतवादापासून मुक्ती मिळेल असा मला विश्वास आहे".
सिंह यांनी यावेळी फुटिरतावादी आणि काश्मीरमधील आंदोलकांना चर्चेसाठी समोर येण्याचे आवाहन केले आहे. आपण एकत्र येऊन सर्व प्रश्न सोडवू, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
राजनाथसिंह यांनी आज जम्मू-काश्मीरमधल्या द्रास सेक्टरमधील कारगिल युद्ध स्मारकाला भेट दिली. तिथे शहीद जवांनाच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी 'वीरभूमी'ला भेट दिली. तसेच कठुआमधील उंज आणि सांबा जिल्ह्यातील बसन्तर येथे बांधण्यात आलेल्या दोन पुलांचे लोकार्पणदेखील सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.
Defence Minister Rajnath Singh in Kathua (J&K): Problem of Kashmir will get solved, no power in the world can stop it. If somebody does not want a solution through talks, then we know very well how a solution can be found. https://t.co/I58tT5yt47
— ANI (@ANI) July 20, 2019
Defence Minister Rajnath Singh in Kathua (J&K): People who are running a movement in Kashmir, if they want a solution through it, I appeal to them to at least sit & talk once, to understand what is the issue, what are the problems, so they could be solved together. pic.twitter.com/Fy2iRJmoyl
— ANI (@ANI) July 20, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement