एक्स्प्लोर

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांचा सांगलीत भव्य सत्कार; आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं काँग्रेसचं शक्तिप्रदर्शन

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांचा सांगलीत भव्य सत्कार होणार आहे.

Maharashtra Sangli Politics: सांगलीत (Sangli News) लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. जिल्हा कॉंग्रेसनं (Congress) 25 जून रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री (Karnataka CM) सिद्धरमय्या (Siddaramaiah) यांच्या सत्कार कार्यक्रमाच्या निमित्तानं मोठं शक्तिप्रदर्शन करत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीचं रणशिंग फुकलं आहे. तर दुसरीकडे सांगली लोकसभा आणि सांगली विधानसभेच्या जागेवर राष्ट्रवादी अजून तरी अप्रत्यक्षपणे दावा सांगण्याचा प्रयत्न करतेय. यामध्ये सध्या भाजपचे (BJP) खासदार असलेले संजयकाका पाटील यांनी पुन्हा आपल्यालाच लोकसभा निवडणुकांचे तिकीट मिळेल, असं गृहीत धरून निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. तर दुसरीकडे मागील वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लोकसभा लढवलेले विशाल पाटील कॉंग्रेसकडून तिकीट मिळवण्याच्या आशेवर पुन्हा सक्रिय होताना दिसत आहेत. 

कर्नाटकमध्ये करिष्मा घडवत काँग्रेसनं भाजपची सत्ता उलथवून टाकून काँग्रेसचा मुख्यमंत्री बसवला. सिद्धरमया हे कर्नाटकातील काँग्रेसचे मुख्यमंत्री बनले. हाच चेहरा काँग्रेस आता महाराष्ट्रामध्ये वापरून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठीच सांगलीमध्ये 25 जून रोजी जिल्हा काँग्रेस कमिटी सिद्धरमय्या यांचा भव्य सत्कार केला जाणार आहे. त्यासोबतच भव्य शेतकरी आणि कार्यकर्ता मेळाव्याचंही आयोजन केलं जाणार आहे. नेहमीच नगरमधील कल्पद्रुम क्रीडांगणावर हा काँग्रेस पक्षाचा भव्य मेळावा पार पडणार आहे. यासाठी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार विश्वजीत कदम हे या मेळाव्याचे आणि सत्कार समारंभाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत.

मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसऐवजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे लोकसभेची जागा गेली होती. विशाल पाटलांनी ही निवडणूक लढवली आणि दोन नंबरची मतं देखील मिळवली. आता मात्र काँग्रेसकडे ही जागा लोकसभेची राहावी यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीची देखील या सांगली लोकसभा आणि सांगली विधानसभेवर नजर आहे.  प्रत्यक्षपणे जरी या जागेची अजून राष्ट्रवादी मागणी करत नसली तरी कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीकडे हे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ जावेत, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. मात्र सांगलीची लोकसभेची जागा काँग्रेसचीच आहे. आमचा या जागेवर पूर्ण अधिकार आहे. ती कोणत्याही एका विशिष्ट गटाची नसून पूर्ण पक्षाची आहे, असे विश्वजित कदम म्हणाले आहेत. यावर जयंत पाटील यांनी मात्र जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. मात्र लोकसभा किंवा विधानसभेच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीतच निर्णय घेतला जाईल, असं सांगत सावध भूमिका घेतली आहे.

दुसरीकडे सांगली लोकसभेवर पुन्हा भाजपकडून आपल्यालाच तिकीट मिळेल या आशेनं विद्यमान खासदार संजय काका पाटील पुन्हा सक्रिय झाले आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर आपल्या विरोधात होते, पण आता गोपीचंद भाजपमध्ये आहेत. त्यामुळे त्यांची मतं देखील आपल्यालाच मिळतील असा देखील विश्वास संजय काका पाटील यांना आहे. तर जत्रा आली म्हणून सराव करणाऱ्यांमधला मी पैलवान नाही, निवडून येण्यासाठी कायम लोकांमध्ये राहावं लागतं, असं म्हणत संजयकाका पाटलांनी कॉंग्रेसचे लोकसभेसाठी पुन्हा इच्छुक असलेल्या विशाल पाटलांना टोला हाणला आहे. या टीकेला विशाल पाटील यांनी अजून तरी समोर न येता सोशल मीडियाद्वारे भाजपच्या खासदारांनी नऊ वर्षात काय केलं असा सवाल करत आहे. नाकी नऊ आलेले नऊ वर्ष असं कॅम्पेन राबवत खासदारांनी जिल्ह्यासाठी काय केलं, असा सवाल विचारत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Omraje Nimbalkar: ओमराजेंना पुण्यातून दिल्लीला नेलं, चार्टर्डमध्ये तानाजी सावंतांचा पुढाकार; 10 तारखेलाच दिल्लीत बैठक
ओमराजेंना पुण्यातून दिल्लीला नेलं, चार्टर्डमध्ये तानाजी सावंतांचा पुढाकार; 10 तारखेलाच दिल्लीत बैठक
Shivsena case in Supreme Court: गेली 3 वर्षे 10 महिने अन् 28 दिवसांपासून ठाकरेंची गल्ली ते दिल्ली न्यायासाठी फरफट; अजूनही तारीख पे तारीख सुरुच असताना पक्ष पुन्हा फोडला
गेली 3 वर्षे 10 महिने अन् 28 दिवसांपासून ठाकरेंची गल्ली ते दिल्ली न्यायासाठी फरफट; अजूनही तारीख पे तारीख सुरुच असताना पक्ष पुन्हा फोडला
'समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार, अमित शाहांना चिठ्ठी पाठवली आहे...' मंत्र्यानं केला दावा; आप, तृणमुलनंतर ठाकरे शिवसेनेंतर आता समाजवादी पक्षाचा नंबर?
'समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार, अमित शाहांना चिठ्ठी पाठवली आहे...' मंत्र्यानं केला दावा; आप, तृणमुलनंतर ठाकरे शिवसेनेंतर आता समाजवादी पक्षाचा नंबर?
Operation Tiger UBT Shivsena: मोठी बातमी : ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा गट स्थापन, आता शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार!
मोठी बातमी : ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा गट स्थापन, आता शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार!

व्हिडीओ

Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Ambadas Danve On Operation Tiger : दम असेल तर निवडून आणा, दुसऱ्यांची पोरं का लागतात
Nitin Deshmukh On Operation Tiger : फुटणाऱ्यांना लाज वाटू दे, मशालीवर निवडून आलात
Operation Tiger : ऑपरेशन टायगर - दिल्लीत हालचालींना वेग, एकनाथ शिंदे आणि UBT खासदार दिल्लीत
Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray vs Eknath Shinde: पहिल्या केसला तारीख पे तारीखचा खेळखंडोबा सुरुच, आता पुन्हा ठाकरे विरुद्ध शिंदे कायदेशीर लढाई; असीम सरोदेंनी सांगितलं फुटीर खासदारांचं भवितव्य
पहिल्या केसला तारीख पे तारीखचा खेळखंडोबा सुरुच, आता पुन्हा ठाकरे विरुद्ध शिंदे कायदेशीर लढाई; असीम सरोदेंनी सांगितलं फुटीर खासदारांचं भवितव्य
वयाच्या 26व्या वर्षी आमदार अन् दोन वर्षांपूर्वी विक्रमी मतांनी दुसऱ्यांदा खासदार; आता शिंदेंच्या गळाला लागताच पुण्यातून दुसऱ्या मार्गाने कलटी मारली, फुटीर ओमराजेंचीच सर्वाधिक चर्चा का होत आहे?
वयाच्या 26व्या वर्षी आमदार अन् दोन वर्षांपूर्वी विक्रमी मतांनी दुसऱ्यांदा खासदार; आता शिंदेंच्या गळाला लागताच पुण्यातून दुसऱ्या मार्गाने कलटी मारली, फुटीर ओमराजेंचीच सर्वाधिक चर्चा का होत आहे?
डी लिमिटेशन विधेयकासाठीच फोडाफोडी, हकुमशाही आणण्याचा प्रयत्न; खासदार फुटीवर माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
डी लिमिटेशन विधेयकासाठीच फोडाफोडी, हकुमशाही आणण्याचा प्रयत्न; खासदार फुटीवर माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या ब्रिजवर भीषण अपघात; कारवर चढली फॉर्च्यूनर, 4 गाड्या एकमेकांना धडकल्या
मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या ब्रिजवर भीषण अपघात; कारवर चढली फॉर्च्यूनर, 4 गाड्या एकमेकांना धडकल्या
Anjali Damania: 'एक नाही असंख्य पक्ष भाजप एकानंतर एक फोडताना दिसतोय उघड्या डोळ्याने होत असताना सुद्धा सुप्रीम कोर्ट विलंब करतंय तर...अंजली दमनियांचा तीव्र संताप
'एक नाही असंख्य पक्ष भाजप एकानंतर एक फोडताना दिसतोय उघड्या डोळ्याने होत असताना सुद्धा सुप्रीम कोर्ट विलंब करतंय तर...अंजली दमनियांचा तीव्र संताप
Kolhapur News: 'बॅड पॅच' सगळ्यांनाच येतो, उद्धव साहेब खचणारे नाहीत, छातीवर पाय ठेवून उभे राहतील! ठाकरेंच्या शिलेदारानं पेटवली निर्धाराची 'मशाल'
'बॅड पॅच' सगळ्यांनाच येतो, उद्धव साहेब खचणारे नाहीत, छातीवर पाय ठेवून उभे राहतील! ठाकरेंच्या शिलेदारानं पेटवली निर्धाराची 'मशाल'
Operation Tiger UBT Shivsena: एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी, आता ठाकरेंची आमदारांबाबत धाकधूक वाढली, 20 आमदार कोण?
एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी, आता ठाकरेंची आमदारांबाबत धाकधूक वाढली, 20 आमदार कोण?
Omraje Nimbalkar: पुण्यातून ओमराजेंच्या 'मातोश्री' म्हणाल्या; रात्री घरीच होते, सकाळी जीमला जातो म्हणून घराबाहेर गेले
पुण्यातून ओमराजेंच्या 'मातोश्री' म्हणाल्या; रात्री घरीच होते, सकाळी जीमला जातो म्हणून घराबाहेर गेले
Embed widget