एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
केजरीवालांवर आरोप करताना कपिल मिश्रा पत्रकार परिषदेतच बेशुद्ध
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात उपोषणाला बसलेल्या कपिल मिश्रा यांचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे. आज त्यांनी केजरिवालांविरोधात मोठा गौप्यस्पोट करण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यातच ते बेशुद्ध झाले.
केजरीवालांवर पुराव्यांशिवाय कोणताही आरोप करणार नाही, असं कपिल मिश्रा यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं. आम आदमी पार्टीच्या देणगीबाबत कपिल मिश्रांनी केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
'आप'मध्ये सर्रासपणे काळ्याचं पाढरं केलं जातं : कपिल मिश्रा
'आप'ने निवडणूक आयोगाला पक्षाच्या निधीबाबत चुकीची माहिती दिली आहे. बनावट कंपन्यांकडून देणगी घेतली जाते. बँकेत 45 कोटी रुपये जमा झाले, मात्र वेबसाईटवर केवळ 19 कोटी रुपये दाखवण्यात आले. म्हणजेच 26 कोटी रुपये लपवले, असा सनसनाटी आरोप कपिल मिश्रा यांनी केला.
‘आप’ने सर्रासपणे काळा पैसा पांढरा केला. ‘आप’ने बनावट कंपन्यांच्या नावावर हवाल्याचे पैसे घेतले. 2013-14 साली पक्षाच्या खात्यात 45 कोटी रुपये होते. मात्र निवडणूक आयोगाला केवळ 9 कोटी दाखवण्यात आले. या सर्व प्रकाराची केजरीवालांना माहिती होती, असंही कपिल मिश्रांनी सांगितलं.
कपिल मिश्रांनी यावेळी केजरीवालांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. पत्रकार परिषदेमध्ये बोलतानाच पाच दिवसांपासून उपोषण करणारे कपिल मिश्रा बेशुद्ध झाले.
यापूर्वीही केजरीवालांवर आरोप
अरविंद केजरीवाल यांनी ‘आप’ नेते सत्येंद्र जैन यांच्याकडून कोटी रुपये घेतल्याचा आरोप दिल्लीचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी केला आहे. सत्येंद्र जैन यांनी केजरीवालांना दोन कोटी रुपये दिल्याचं आपण स्वतः पाहिलं, असा सनसनाटी आरोप मिश्रा यांनी केला आहे.
50 कोटींच्या जमीन व्यवहारासाठी हे पेसै दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केजरीवालांच्या एका नातेवाईकासाठी जमीन व्यवहार प्रकरणी ही पैशांची देवाणघेवाण झाल्याचा दावा मिश्रांनी केला आहे.
जैन यांनी केजरीवालांना दोन कोटी रुपये देताना मी स्वत: पाहिलं, त्यानंतर रात्रभर झोपू शकलो नाही, असंही कपिल मिश्रा म्हणाले. दिल्लीच्या जल, पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रिपदावरुन कपिल मिश्रा यांची हकालपट्टी करण्यात आली होती. मिश्रा हे कुमार विश्वास यांचे निकटवर्तीय नेते मानले जातात.
संबंधित बातम्या :
केजरीवालांनी सत्येंद्र जैनांकडून दोन कोटी घेतले : कपिल मिश्रा
कपिल मिश्रांच्या आरोपानंतर अण्णा हजारेंचं केजरीवालांवर टीकास्त्र
‘आप’चे माजी मंत्री कपिल मिश्रांना जीवे मारण्याची धमकी
केजरीवालांविरोधात उपोषण, आमदार कपिल मिश्रांवर हल्ला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
सोलापूर
Advertisement