एक्स्प्लोर
कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, शिवराजसिंहांच्या कृतीची प्रशंसा
राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी कमलनाथ यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह समविचारी पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते.
भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची तर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्यात एका दृश्याने सर्वजण चकीत झाले.शपथविधी सोहळ्यात शिवराज सिंह यांनी दोन्ही नेत्यांचं अभिनंदन केलं. यावेळी कमलनाथ आणि सिंधिया यांनी शिवराज यांना मध्ये उभं करत हात हातात घेऊन उंचावले आणि उपस्थितांना अभिवादन केलं.
राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी कमलनाथ यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. कमलनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह समविचारी पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या शपथविधी सोहळ्याला शिवराज सिंह चौहान आवर्जून उपस्थित राहिले. त्यांनी दोन्ही नेत्यांचं अभिनंदन केलं. यावेळी कमलनाथ आणि सिंधिया यांनी शिवराज यांना मध्ये उभं केलं. त्यांचे हात हातात घेऊन उंचावले आणि उपस्थितांना अभिवादन केलं. या सोहळ्याच्या निमित्तानं राज्यातील नेत्यांच्या मनाची उदारता पाहायला मिळाली. प्रचारादरम्यान काँग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती. यानंतर 11 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल आला आणि तब्बल दीड दशकांपासून भाजपाच्या ताब्यात असलेलं मध्य प्रदेश काँग्रेसकडे गेलं. यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी तीनही राज्यातील भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. निवडणुकीत हारजीत होतच असते. मात्र या मुख्यमंत्र्यांनी राज्यांच्या विकासात जे योगदान दिलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, अशा शब्दांमध्ये राहुल यांनी तिन्ही नेत्यांना धन्यवाद दिले होते. मंत्रोच्चार आणि शंखनादाचा गजर महत्वाची बाब म्हणजे शपथविधीपूर्वी मंचावर एक वेगळच चित्र पहायला मिळालं. अंदाजे डझनभर साधू संतांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. यावेळी मंत्रोच्चार आणि शंखनादाने संतांनी कमलनाथ यांना आशिर्वाद दिले. दुसरीकडे मात्र दिल्लीत शीख समुदायानं कमलनाथ यांना मुख्यमंत्री करण्यास विरोध दर्शवला. आजच 1984 च्या शीख दंगलीप्रकरणी काँग्रेस नेता सज्जन कुमार याला दिल्ली उच्च न्यायालयानं दोषी ठऱवलं. त्या दंगलीत कमलनाथ हे सुद्धा आरोपी आहेत. मात्र तरीही त्यांना मुख्यमंत्रीपदी कसं बसवलं जातंय., असा प्रश्न शीख समुदायाकडून विचारला जातोय.#WATCH Madhya Pradesh: Former CM Shivraj Singh Chouhan, Jyotiraditya Scindia and Kamal Nath at Nath's swearing-in ceremony in Bhopal. pic.twitter.com/KrTz5RB5JT
— ANI (@ANI) December 17, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement