एक्स्प्लोर

Joshimath News: बेसुमार विकासकामांमुळे देवभूमी ढासळतेय? हिमालयाच्या संकेतातून धडा घेण्याची गरज

Joshimath News: जोशीमठमधल्या या भेगा काही अचानक आलेल्या नाहीत. याआधी निसर्गानं दिलेल्या अनेक इशाऱ्यांकडे केलेलं हे दुर्लक्ष आहे. 2021 मध्येही काही ठिकाणी भेगा पडल्याची उदाहरणं होती.

Joshimath Land Subsidence Update: हिमालयाच्या कुशीत वसलेलं, बद्रीनाथच्या वाटेवर असलेलं जोशीमठ सध्या एका भयानक संकटाला तोंड देतंय. हे शहर जणू जमिनीत खचत चालले आहेत. एकाचवेळी शहरातल्या पाचशेहून अधिक घरांना मोठे तडे गेले आहेत. जोशीमठची ही आजची स्थिती पाहिली तर केदारनाथच्या महाप्रलयासारख्या काही जुन्या घटनाही ताज्या होतात. या दुर्घटना घडण्यामागे नेमकं काय कारण आहे?

जोशीमठ..बद्रीनाथसाठीचं प्रवेशद्वार आहे. भारत चीन सीमेवरचा लष्कराचा मोक्याचा तळ...पण हिमालयाच्या कुशीतलं हे गाव सध्या वेगळ्या कारणांनी  चर्चेमध्ये आहे. एकदोन नव्हे तर इथल्या 500 घरांना असे तडे गेले आहेत. या भेगा पण साध्या नाहीत. सगळ्या शहरावर वीतभर भेगा पडत जमीन फाटली आहे. लोक भयभीत झाले आहेत. रात्री मशाल मोर्चे काढत आहेत 

 जोशीमठमधल्या या संकटाची पहिली चाहूल 1976 मध्येच दिली गेली होती. रस्ते, जलविद्युत प्रकल्प आणि शहर विकासाच्या नावाखाली अतिक्रमण केले तर जोशीमठमध्ये अशी स्थिती उद्भवू शकते याचा इशारा मिश्रा समितीच्या रिपोर्टमध्ये देण्यात आला होता.

 हिमालयातलं हे  शहर खचत का चाललंय? 

  • उत्तराखंडमधल्या चमौली जिल्ह्यात 6150 फूट उंचीवर जोशीमठ वसलं आहे
  •  हिंदूंसाठी पवित्र चारधामपैकी एक धाम बद्रीनाथसाठीचं हे प्रवेशद्वार
  • 20 हजार लोकवस्तीच्या या गावात 500 घरांना अशा मोठ्या भेगा पडल्यात
  •  हिमालयाच्या दरडी कोसळणारी ही जागा, त्याच जागेवर काही वर्षांपूर्वी हे शहर वसलं
  • गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या परिसरात जलविद्युत प्रकल्प, रस्ते रुंदीकरण आणि इतर बांधकामं वाढली
  • चारधामसाठी हायवे रुंदीकरणाचं काम इथं सुरु आहे, जे सध्या स्थानिकांच्या विरोधामुळे थांबवलं गेलं

 जोशीमठमध्ये 4 जानेवारीपासूनच परिस्थिती गंभीर बनत गेली. लोक रात्रीचे मशाल मोर्चे काढत आहेत हायवेची कामं बंद करण्यासाठी निदर्शन करत आहे. एनटीपीसी जे इथल्या जलविद्युत प्रकल्पांची कामं करतंय. त्यांच्या कार्यालयावर निदर्शनं करण्यात आली आहे. 

 राज्य आणि केंद्र सरकारनंही याबाबत हालचाली सुरु केल्या. संकटाच्या पार्श्वभूमीवर लोकांना स्थलांतरित करण्याची मोहीम सुरु झाली आहे. लष्कराचे चॉपर्स त्यासाठी तैनात ठेवले गेल.या संपूर्ण स्थितीबाबत काय करता येईल यासाठी केंद्र सरकारनंही तातडीनं समितीची घोषणा केलीय. पण यात सगळे सरकारीच लोक आहेत. अशा संकटात सरकारी धोरणांचं कडक परीक्षण व्हायचं असेल तर एखाद्या खासगी तज्ज्ञांनाही घ्यायला हवं होतं अशीही टीका होतेय.

जोशीमठमधल्या या भेगा काही अचानक आलेल्या नाहीत. याआधी निसर्गानं दिलेल्या अनेक इशाऱ्यांकडे केलेलं हे दुर्लक्ष आहे. 2021 मध्येही काही ठिकाणी भेगा पडल्याची उदाहरणं होती. त्यामुळे आता या संकटातून तरी काही ठोस धडा आपण घेतो का हे पाहावं लागेल. 2013 पासून हिमालयाने आपलं रौद्र रुप दाखवायला सुरुवात केली आहे. हिमालयाच्या या संकेतांमधून आपण जर धडा घेतलाच नाही. तर आपल्याला आणखी मोठ्या संकटाला तयार राहावं लागणार आहे... 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Ahilyanagar Crime: भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Ahilyanagar Crime: भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
Embed widget