एक्स्प्लोर
‘जौहरी हटाव, बेटी बचाव’, जेएनयूत विद्यार्थ्यांची निदर्शनं
दिल्ली पोलिस बैठकांवर बैठका घेत आहेत, मात्र प्राध्यापक अतुल जौहरी यांच्याविरोधात कारवाईसाठी एकही पाऊल उचलत नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
नवी दिल्ली : दिल्लीतील जेएनयूच्या विद्यार्थांनी मध्यरात्री रस्त्यावर येऊन निदर्शनं केली. त्यानंतर दक्षिण दिल्लीतील वंसत कुज पोलिस स्थानकासमोर काही वेळ घोषणाबाजीही केली. विद्यापीठातील प्राध्यापक अतुल जौहरी यांच्यावर छेडाछाडीचा आरोप करत विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलं.
प्राध्यापक अतुल जौहरी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र त्यांना अद्याप अटक करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांच्या अटकेची मागणी करत विद्यार्थ्यांनी मध्यरात्री निदर्शनं केली. यावेळी विद्यार्थी आणि पोलिसांमध्येही बाचाबाची झाली.
विद्यार्थ्यांनी मध्यरात्री जेएनयू ते वसंत कुंज पोलिस ठाण्यापर्यंत मोर्चा काढला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे वसंत कुंज पोलिस ठाण्यासमोरील नेल्सन मंडेला रोडवर वाहतूक कोंडी झाली होती.
जेएनयूची विद्यार्थी संघटनाही यावेळी पोलिस ठाण्याबाहेर हजर होती.
दिल्ली पोलिस बैठकांवर बैठका घेत आहेत, मात्र प्राध्यापक अतुल जौहरी यांच्याविरोधात कारवाईसाठी एकही पाऊल उचलत नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement