एक्स्प्लोर
'सैराट' चित्रपट दाखवण्याच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार
नवी दिल्ली : दिल्लीच्या जेएनयूमध्ये एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 'सैराट' चित्रपट दाखवण्याचा बहाणा करुन बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे.
पीडित तरुणी जेएनयूमध्ये पीएचडीच्या पहिल्या वर्षाला शिकत आहे. विद्यापीठातीलच एका विद्यार्थ्यानं बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. त्यानुसार आरोपी अनमोलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणीने आपल्याला 'सैराट' चित्रपट पाहण्याची इच्छा असल्याचं फेसबुकवर लिहिलं होतं. त्यानंतर आरोपीने तिला आपल्याकडे सीडी असल्याचं सांगितलं. त्यावेळी सिनेमाची सीडी देण्याच्या बहाण्याने हॉस्टेल रुमवर त्याने बलात्कार केल्याची तक्रार पी़डितेने केली आहे.
आरोपी अनमोल हा ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनचा कार्यकर्ता आहे. मात्र बलात्काराच्या आरोपांनंतर त्याला असोसिएशनमधून काढून टाकण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement