VIDEO : गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये लपवून बॉईज हॉस्टेलमध्ये आणलं, मुलीचा आवाज येताच बॉयफ्रेंडचा कारनामा उघड
Jindal University in Haryana Sonipat : गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये लपवून बॉईज हॉस्टेलमध्ये आणलं, मुलीचा आवाज येताच बॉयफ्रेंडचा कारनामा उघड

Jindal University in Haryana Sonipat : प्रेमात कोण काय करेल याचा नेम नाही. एका मुलाने त्याच्या गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये लपवून बॉईज हॉस्टेलमध्ये आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. दरम्यान, त्याचा हा प्रयत्न अपयशी ठरलाय. सुटकेसमध्ये लपवलेल्या गर्लफ्रेंडचा आवाज येताच बॉयफ्रेंडचा हा कारनामा सर्वांसमोर उघड झालाय. सुटकेस उचलत असताना झटका बसला आणि गर्लफ्रेंडच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यावेळी उभ्या असलेल्या गार्ड्सना संशय आला आणि त्यांनी सुटकेस तपासली. त्यावेळी त्यामध्ये मुलगी असल्याचं समोर आलं. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
A boy tried sneaking his girlfriend into a boy's hostel in a suitcase.
— Squint Neon (@TheSquind) April 12, 2025
Gets caught.
Location: OP Jindal University pic.twitter.com/Iyo6UPopfg
हरियाणाच्या सोनीपत येथील जिंदाल विद्यापीठातील व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका विद्यार्थ्याला सूटकेसमध्ये एका मुलीला मुलांच्या वसतिगृहात आणण्याचा प्रयत्न करताना पकडण्यात आले. वसतिगृहाच्या सुरक्षा रक्षकांनी विद्यार्थ्याला थांबवले आणि सुटकेस उघडताना ती मुलगी सापडली. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबतचं वृत्त इकॉनॉमिक्स टाईम्सने दिलं आहे.
तरुण सुटकेस हॉस्टेलच्या आत नेण्याचा प्रयत्न करत असताना अचानक धक्का बसला आणि सुटकेसच्या आतून मुलीचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. सुरक्षा रक्षक लगेच सावध झाले आणि त्यांनी सुटकेस उघडण्यास सांगितले. जेव्हा त्यांनी आत पाहिले तेव्हा सगळेच थक्क झाले - आत एक मुलगी बसली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Guy tried Sneaking his Girlfriend into the Boys hostel in a Suitcase.. one Bump and she screamed from inside. guards Heard it and they got Caught, Op Jindal Uni
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 12, 2025
pic.twitter.com/xBkBTYymdt
या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून येते की वसतिगृहाच्या गेटवरील रक्षक सुटकेस तपासतात आणि नंतर ती मुलगी आतून बाहेर येते. व्हिडिओमध्ये तिथे उपस्थित असलेल्या लोकांचे हास्यही ऐकू येत आहे.
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडलाय. काही जण याला 'मिशन इम्पॉसिबल बॉईज हॉस्टेल एडिशन' म्हणत आहेत तर काही जण म्हणत आहेत, "प्रेमात माणूस काहीही करू शकतो!" दरम्यान, काही लोक सुरक्षा आणि शिस्तीच्या दृष्टीने या घटनेवर भाष्य करत आहेत. ही घटना कोणत्या महाविद्यालयात किंवा वसतिगृहात घडली याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, परंतु असे म्हटले जात आहे की या प्रकरणाची चौकशी केली जात आहे आणि जबाबदार असलेल्यांवर कारवाईची तयारी केली जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI























