सुहागरात्रीलाच नवरा म्हणाला, मला तुझा चेहरा आवडत नाही, प्रेयसीचा फोटो काढून दाखवला; 20 लाखांची मागणी करत हातात पेट्रोल घेतलं अन्.. भयंकर प्रकाराने थरकाप
लग्नाच्या सर्व विधींनंतर, जेव्हा सुहागरात्रीची वेळ आली, तेव्हा दानिशने बुरखा उचलला आणि म्हणाला ,"मला तुझा चेहरा आवडत नाही."

सुहागरात्रीलाच वराने आपल्या पत्नीचा चेहरा पाहिल्यानंतर घटस्फोट दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढेच नाही तर त्याने मोबाईलमधून प्रेयसीचा फोटो दाखवला आणि लग्नाचे नाटक आहे म्हणत पत्नीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. 'मुह दिखाई' नंतर हिनाचे नशीब खिन्न झाले. बुलंदशहरातील आनंद विहार कॉलनीतील रहिवासी हिना मलिकचा विवाह खोडा कॉलनीतील रहिवासी दानिश मलिकशी झाला. लग्नाच्या सर्व विधींनंतर, जेव्हा सुहागरात्रीची वेळ आली, तेव्हा दानिशने बुरखा उचलला आणि म्हणाला ,"मला तुझा चेहरा आवडत नाही."
लग्नासाठी 30 लाख रुपये खर्च केले, अतिरिक्त 20 लाख रुपयांची मागणी
दानिशने आपला मोबाईल काढला आणि एका मुलीचा फोटो दाखवत म्हणाला, "ही मुस्कान आहे, माझी मैत्रीण. मी गेल्या पाच वर्षांपासून तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे." दानिशने स्पष्टपणे सांगितले की त्याने हे लग्न फक्त त्याच्या पालकांचा आदर करण्यासाठी केले आहे. लग्नानंतर दानिश आणि त्याच्या कुटुंबाने अतिरिक्त 20 लाख रुपयांची मागणी करण्यास सुरुवात केली. त्यांचा युक्तिवाद असा होता की, "दानिशचे लग्न 50 लाख रुपयांत निश्चित होऊ शकले असते, आम्ही कमीत कमी रकमेत लग्न केले." जेव्हा हिनाच्या पालकांनी ही मागणी नाकारली तेव्हा दानिश आणि त्याच्या कुटुंबाने हिनाला मारहाण केली आणि तिला घराबाहेर हाकलून लावले.
पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न
पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न हिनाने सांगितले की, एका रात्री ती झोपली असताना दानिशने तिच्यावर पेट्रोल ओतले. सुदैवाने, जेव्हा ती जागा झाली तेव्हा तिने आवाज केला आणि आजूबाजूचे लोक आले, ज्यामुळे ती जळण्यापासून वाचली. हिनाने बुलंदशहर कोतवाली ग्रामीणमध्ये दानिश, त्याचे पालक आणि कुटुंबातील इतर सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घरगुती हिंसाचार, खून करण्याचा प्रयत्न, हुंडा छळ आणि फसवणूक या कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि लवकरच आरोपीला अटक केली जाईल.
इतर महत्वाच्या बातम्या























