एक्स्प्लोर

Jharkhand Election Results 2019 | महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडही भाजपकडून निसटलं, काँग्रेस-जेएमएमचं सरकार निश्चित

मतदानानंतर झालेल्या एक्झिट पोलमध्ये वर्तवलेला अंदाज खरा ठरत असल्याचं चित्र कलांमध्ये दिसत आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये काँग्रेस-जेएमएम आणि राजदला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

Jharkhand Election Results 2019: रांची : महाराष्ट्रात सत्तेतून बाहेर राहिल्यानंतर आता झारखंडमध्येही भाजपला मोठा झटका बसल्याचं दिसत आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या सर्व 81 जागांचे कल हाती आहेत. यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस आणि राजद यांची सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. काँग्रेस, जेएमएम आणि राजद आघाडीला 42 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर यंदा स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला भाजप पक्ष 28 जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय आजसूला 3, झारखंड विकास मोर्चा 4 आणि इतरांना 4 जागांवर आघाडी मिळाली आहे. 2014 मध्ये 37 जागा जिंकून आजसूसोबत सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपने यंदा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. भाजपने 34 टक्के मतांसह राज्यात सर्वाधिक मतं मिळवली, पण आघाडी म्हणून  झामुमो आणि काँग्रेसने सत्ता काबीज केली. मुख्यमंत्री रघुवर दास यांचं कामकाज जनतेला आवडलेलं नाही. याशिवाय बिगर-आदिवासी मुख्यमंत्री असल्याने सामाजिक समीकरणही भाजपविरोधात गेल्याचं म्हटलं जात आहे. झारखंड विधानसभेच्या 81 जागांसाठी 30 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान पाच टप्प्यात मतदान झालं होतं. एकूण 1216 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. बहुमतासाठी 41 जागांची गरज आहे. खरंतर पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्याचा भाजपला विश्वास होता. मात्र काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय जनता दल आघाडीने सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल केली आहे. एक्झिट पोलमध्ये महाआघाडीच्या विजयाचा अंदाज दरम्यान मतदानानंतर झालेल्या एक्झिट पोलमध्ये वर्तवलेला अंदाज खरा ठरत असल्याचं चित्र कलांमध्ये दिसत आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये काँग्रेस-जेएमएम आणि राजदला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर एबीपी आणि सीवोटरच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 32, महाआघाडी 35, जेव्हीएम 3 आणि आजसू 5 आणि इतर 6 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. संबंधित बातम्या Jharkhand Election Results: रघुवर दास पुन्हा येणार की काँग्रेस-जेएमएम आघाडीचा विजय होणार?
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Imran Khan : इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा! भेटीवर बंदी अन् बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाकिस्तानात खळबळ
इम्रान खान कुठे आहेत? तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा, पाकिस्तानमध्ये खळबळ, कुटुंबीयांना भेट घेण्यापासून अडवलं
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Bhusawal:भुसावळ-नगरपरिषदेचा महासंग्राम, नराध्यक्षांकडून नागरिकांना अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Alibag : निवडणुकीबाबत काय वाटतं अलिबागकरांना? शेकाप पुन्हा सत्ता राखणार?
Mahapalikecha Mahasangram Dharashiv : धाराशीव शहरातील रिक्षा चालकांना निवडणुकीबाबत काय वाटतं?
Anjali Damania PC : 24 तासांत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तर...
Ekanth Shinde Nagpur : लाडकी बहीण कधी बंद होणार नाही, एकनाथ शिंदे यांचा पुन्हा एकदा शब्द

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bogus Voters List : रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
रस्त्यावरील नशाबाज, भिकाऱ्यांची बोगस नावे मतदारयादीत, चेंबूरमधील भिक्षुक गृहावर मनसेची धडक मोहीम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Imran Khan : इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा! भेटीवर बंदी अन् बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाकिस्तानात खळबळ
इम्रान खान कुठे आहेत? तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा, पाकिस्तानमध्ये खळबळ, कुटुंबीयांना भेट घेण्यापासून अडवलं
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
अनेकजण आमच्या संपर्कात, गेलेले लोक परत येतील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
अनेकजण आमच्या संपर्कात, गेलेले लोक परत येतील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
मुंबईतील इमारतीत आग, घर जळून खाक; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी
मुंबईतील इमारतीत आग, घर जळून खाक; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी
Meerut Crime News: मेरठमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी पत्नी मुस्कान झाली आई, मुलीला दिला जन्म, सासरच्यांनी केली डीएनए चाचणीची मागणी
मेरठमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी पत्नी मुस्कान झाली आई, मुलीला दिला जन्म, सासरच्यांनी केली डीएनए चाचणीची मागणी
IIT Mumbai : आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? भाजप मंत्र्याच्या वक्तव्यानंतर वाद वाढणार अन् राजकारण तापणार
आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? भाजप मंत्र्याच्या वक्तव्यानंतर वाद वाढणार अन् राजकारण तापणार
Embed widget