एक्स्प्लोर
Advertisement
तिकीट असूनही राजू शेट्टींना न घेताच विमान उडालं!
नवी दिल्ली: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना जेट एयरवेजचा फटका बसला. बोर्डिंग पास घेऊनही राजू शेट्टी यांना न घेताच विमानाने उड्डाण केलं.
काय आहे प्रकरण?
राजू शेट्टी हे मुंबईहून दिल्लीला जात होते. त्यांनी मुंबई विमानतळावर आज सकाळी सहाच्या विमानाचं बिझनेस क्लासचं तिकीट घेतलं. ते तासभर आधीच मुंबई विमानतळावर पोहोचले होते. विमानतळावर त्यांनी रितसर बोर्डिंग पास घेतला होता.
प्रवासाला वेळ होता म्हणून ते लॉन्जमध्ये येऊन बसले. त्यांनी रजिस्टरमध्ये नोंदही केली.
खासदार राजू शेट्टी हे कधीही प्रोटोकॉल घेत नाहीत. तसेच मदतनीसही घेत नाही. काही वेळाने ते बोर्डिंगसाठी लॉन्जबाहेर आले. मात्र बोर्डिंगद्वार बंद झाल्याचे त्यांना कळवण्यात आले.
बोर्डिंग पास घेतलेला असूनही असे विसरुन जाणे हा विमान कंपनीचा हलगर्जीपणा असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. मात्र जेट एअरवेजने थेट हात वर केले.
राजू शेट्टी यांनी आपल्याला दिल्लीला आवश्यक मिटिंगसाठी जाणे गरजेचं असल्याने पर्यायी व्यवस्था करण्याची विनंती केली. त्यावेळी जेट एअरवेज प्रशासनाने त्यांना सातच्या विमानाचे बदली तिकीट दिले. पण त्यासाठी दोन हजार रुपये वसूल केले.
राजू शेट्टी यांनी आपली चूक नसल्याने पैसे भरण्यास नकार दिला. मात्र जेट एयरवेज ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते.
शेवटी राजू शेट्टी यांनी कार्डद्वारे दोन हजार रुपयांचं पेमेंट केलं. मात्र त्याची पावती मागितली असता, एयरवेज कंपनीने ती देण्यास नकार दिला.
या सर्व मनस्थापामुळे राजू शेट्टी यांनी एयरपोर्ट प्रशासनाकडे तक्रार करणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं.
काही दिवसापूर्वीच शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड आणि एअर इंडिया यांच्यातील वाद चांगलाच गाजला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement