JEE Main 2021: जेईई परीक्षा 17 जुलैला होणार तर 14 ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर करणार
JEE Main 2021 Exam Date: कोरोनामुळे ही परीक्षा नुकतीच पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे.
JEE Main 2021 Exam Date: जेईई मेन परीक्षेची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संयुक्त प्रवेश मंडळाने बुधवारी या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. मंडळाच्या म्हणण्यानुसार ही परीक्षा 17 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जेईई मेनचा निकाल 14 ऑगस्टपर्यंत जाहीर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना साथीच्या आजारामुळे ही परीक्षा नुकतीच पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बर्याच काळापासून या परीक्षा आयोजित करण्याबाबत चर्चा सुरू होती.
किती विद्यार्थी जेईई देणार?
यावेळी देशभरातील 174 केंद्रांवर घेण्यात येणाऱ्या जेईई मेनमध्ये, 92,695 विद्यार्थी उपस्थित राहतील. संयुक्त प्रवेश मंडळाच्या म्हणण्यानुसार निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांचे समुपदेशन तीन टप्प्यात पूर्ण केले जाईल. 15 सप्टेंबरपर्यंत समुपदेशन प्रक्रिया पूर्ण करण्याची योजना आहे. इंजिनीअरिंगच्या प्रवेशासाठी होणाऱ्या या परीक्षेच्या तारखेची विद्यार्थी खूप दिवस प्रतीक्षा करत होती. अखेर मंडळाने परीक्षेसंदर्भात निर्णय घेतला.
कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती
यापूर्वी ही परीक्षा एप्रिलमध्ये घेण्यात येणार होती. परंतु, कोरोना आणि लॉकडाऊनच्या दुसर्या लाटेमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या धोक्यामुळे जेईई, एनईईटीसह अनेक प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करता सरकारने हा निर्णय घेतला होता. कोरोनामुळे मंडळाने सर्व केंद्रे व राज्यातील दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द केल्या होत्या.
देशात कोरोनाची स्थिती काय आहे?
देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेग मंदावला आहे. मात्र, धोका अजूनही कायम आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे सुमारे 50 हजार रुग्ण आढळले आहेत. अशातच कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार देशात आढळला आहे, जो अत्यंत धोकादायक मानला जातो. अशा परिस्थितीत जेईई मेन परीक्षेदरम्यान कठोर नियमांचे पालन केले जाईल. संयुक्त प्रवेश मंडळाने सुरक्षित पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी रोडमॅप तयार केला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून परीक्षेकडे आस लावून बसलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.