(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jammu Terrorist Attack : जम्मूमध्ये दहशतवादी हल्ला; नरवाल भागात दोन स्फोट, 6 जण जखमी
Jammu Terrorist Attack : जम्मूच्या (Jammu) नरवाल भागात दहशतवादी हल्ला झाला आहे. नरवाल भागात दोन स्फोटात सहा जण जखमी झाले आहेत.
Jammu Kashmir Terrorist Attack : जम्मूमधील (Jammu) नरवाल भागात (Narwal Area) दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) झाला आहे. शनिवारी (21 जानेवारी) सकाळी नरवाल बागात दोन स्फोट (Blast) झाले आहेत. या स्फोटात सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. सैन्य दल आणि पोलिसांच्या मदतीने परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे. नरवाल भागात झालेल्या स्फोटानंतर संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवण्यात येत आहे.
J&K | Twin blasts occurred in Narwal area of Jammu, 6 people injured. Details awaited. pic.twitter.com/TYkiUoLnCP
— ANI (@ANI) January 21, 2023
प्रजासत्ताक दिन आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे सध्या संपूर्ण परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. असे असतानाही दोन स्फोट झाले आहेत. पोलीस या स्फोटामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नरवाल भागात दोन वाहनांमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले आहेत. जखमीवर जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. परिसरात नाकेबंदी करण्यात आली असून पोली कर्मचारी आणि सैन्य दलाकडून तपासणी आणि चौकशी करण्यात येत आहे.
सैन्यदल आणि पोलीस घटनास्थळी दाखल
जम्मूच्या नरवाल भागात झालेल्या स्फोटानंतर पोलीस आणि सैन्यदल घटनास्थळी पोहोचलं आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, नरवाल भागातील ट्रान्सपोर्ट नगरच्या सात आणि नऊ यार्डमध्ये हे स्फोट झाले आहेत. घटनास्थळी उभी असलेली सर्व वाहने हटवण्याचं काम पोलीस करत आहेत.
#WATCH | J&K: Six people injured in two blasts that occurred in Narwal area of Jammu. Visuals from the spot. Police personnel are present at the spot. pic.twitter.com/eTZ1exaICG
— ANI (@ANI) January 21, 2023
मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
राहुल गांधी यांच्या दौरा आणि काही दिवसांवर आलेला प्रजासत्ताक दिन यामुळे जम्मू आणि काश्मीर भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) शक्ती पाठक यांनी परिसराला भेट देत संपूर्ण भागात पाहणी केली आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADG) मुकेश सिंह यांनी स्थानिक लोक आणि पोलिस अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली आहे.
दहशतवादी हल्ल्याबाबत अलर्ट जारी
सैन्य दलाने सुत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे 26 जानेवारी आधी दहशतवादी हल्ला होणार असल्याचा अलर्ट जारी केला होता. या अलर्टनुसार, जम्मूमध्ये कधीही दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.