एक्स्प्लोर

Rajouri Encounter : दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत लष्करातील कुत्रा शहीद, केंटला तिरंग्यात लपेटून अखेरचा निरोप

Jammu Kashmir Terrorsist Encounter : काश्मीरमध्ये सैन्य दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत लष्कराच्या केंट नावाच्या कुत्र्याचा मृत्यू झाला.

राजौरी : जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu Kashmir Encounter) सैन्य दलाकडून सर्च ऑपरेशन (Indian Army Search Operation) राबवलं जात आहे. या परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहिम राबवली जात आहे. काश्मीरच्या राजौरी (Rajouri Encounter) भागात सैन्य दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. यादरम्यान, सैन्य दलाच्या कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. राजौरी भागात झालेल्या चकमकीत कुत्र्याला गोळी लागली होती.

तिरंग्यामध्ये लपेटून केंटला अखेरचा निरोप

जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी (Rajouri Encounter) येथे सुरक्षा दलांच्या (Indian Army) तुकडीचं नेतृत्व करताना गोळी लागल्याने आर्मी डॉग युनिटचा एक भाग असलेल्या केंट नावाच्या कुत्र्याचा  मृत्यू झाला. 12 सप्टेंबर रोजी, राजौरीमध्ये लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या गोळीबारात भारतीय लष्कराच्या 21 आर्मी डॉग युनिटमधील केंटचा मृत्यू झाला. केंट या सहा वर्षीय मादी लॅब्राडोरचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. तिरंग्यामध्ये लपेटून भारतीय लष्कराने केंट या कुत्र्याला अखेरचा निरोप दिला. 

राजौरीमध्ये दहशतवादी आणि सैन्य दलात चकमक

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी, 12 सप्टेंबर रोजी जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील एका दुर्गम गावात छापा टाकण्यासाठी गेलेल्या सुरक्षा दलाच्या पथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यावेळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. सैन्य दलाने एका दहशतवाद्याला ठार केलं.

दहशतवाद्यांचा सैन्य दलावर हल्ला

राजौरी भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सैन्य दलाला मिळाली होती. त्यानुसार, या भागात सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. यावेळी दहशतवाद्यांनी पोलीस आणि लष्कराला चकवा देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सैन्य दलाने दहशतवाद्यांचा पाठलाग केला. यावेळी लष्कराच्या पथकामध्ये केंट हा कुत्रा देखील होता. केंटने माग काढत लष्कराला दहशतवाद्यांना शोधण्यात मदत केली. 

तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश

यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल सैन्य दलानेही गोळीबार केला. मात्र, दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु असताना एक गोळी केंटला लागली. या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला, तर सुरक्षा दलाने तीन हशतवाद्यांना कंठस्नान घातलं. मात्र, 21 आर्मी डॉग युनिटमध्ये समाविष्ट असलेल्या केंट नावाच्या भारतीय लष्कराच्या कुत्र्याचाही मृत्यू झाला आहे. केंटला गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Anantnag Encounter: अनंतनागमध्ये आणखी एक जवान जखमी, परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी लष्कराचे प्रयत्न

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ९ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 September 2024Amit Shah On Vidhan Sabha : अमित शाहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र #abpमाझाNarendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्यमाझं गाव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 730 AM Superfast 26 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
PM Modi in Pune: पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? एसपी कॉलेजमध्ये चिखल झाला तर सभा कुठे होणार, आयोजकांकडून तयारीला सुरुवात
पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? पर्यायी चाचपणी सुरु, आयोजक तयारीला लागले
Navratri 2024 : नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Bengaluru Crime : बंगळुरुत महालक्ष्मीचे 59 तुकडे करुन पळाला, आता मुख्य आरोपीचा मृतदेह ओडिशात सापडला, सस्पेन्स वाढला
बंगळुरुतील महालक्ष्मी खून प्रकरणाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह आढळला, सस्पेन्स वाढला
Mumbai Rain : मुसळधार पावसानं झोडपलं, 250 मिमीहून अधिक पाऊस पडला, लोकल खोळंबली, विमानं वळवली अन् रस्त्यावर वाहतूक कोंडी,मुंबईकरांचे प्रचंड हाल
मुंबईला पावसानं झोडपलं, पाणी साचलं, वाहतूक कोंडी अन् लोकल खोळंबल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल
Embed widget