एक्स्प्लोर
जम्मू काश्मीरमध्ये राजकीय भूकंप, विधानसभा बरखास्त
पीपल्स कॉन्फरन्सचे सज्जाद लोन आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यपालांना चिठ्ठी लिहून जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आपल्याकडे पुरेसं संख्याबळ असल्याचा दावा केलेला असतानाच राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त केली आहे.
नवी दिल्ली : जम्मू-कश्मीरच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आला आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जम्मू-कश्मीर विधानसभा बरखास्त केली आहे. यामुळे आता राज्यात पुन्हा नव्याने निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यपालांच्या या निर्णयामुळे पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे आज सायंकाळी त्यांनी राज्यपालांना पत्र लिहीत सत्ता स्थापनेचा दावा केला होता.
पीपल्स कॉन्फरन्सचे सज्जाद लोन आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यपालांना चिठ्ठी लिहून जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आपल्याकडे पुरेसं संख्याबळ असल्याचा दावा केलेला असतानाच राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त केली आहे.यामुळे काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या बळावर सरकार स्थापन करण्याच्या मेहबूबा मुफ्ती यांच्या प्रयत्नांना मोठा झटका बसला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी पक्षाने काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या सहयोगाने सत्ता स्थापनेचा दावा केला होता.
जम्मू काश्मीर विधानसभेमध्ये पीडीपीचे 28 , नॅशनल कॉन्फरन्सचे 15 आणि काँग्रेसचे 12 आमदार आहेत. पीडीपी-नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस मिळून 55 आकडा होतो. जम्मू काश्मीरमध्ये सत्ता स्थापनेसाठी 44 आमदारांची गरज असते.
पीडीपीचे आमदार इमरान अन्सारी यांनी बंडाचा झेंडा उगारला असून आपल्याकडे 18 आमदार असल्याचं सांगत त्यांनीही सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडे दावा सादर करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यापूर्वीच राज्यपालांनी विधानसभा बरखास्त करून मेहबूबा मुफ्ती आणि सज्जाद लोन यांना मोठा झटका दिला आहे. जम्मू काश्मीरमध्ये भाजपने पीडीपीला दिलेला पाठिंबा काढून घेतला होता. त्यामुळे मेहबूबा मुफ्ती यांचे सरकार पडले होते. काश्मीरमधील स्थिती नियंत्रित न होण्याचे खापर भाजपने पीडीपीवर फोडले होते.
विधानसभा बरखास्तीनंतर सत्ता स्थापनेच्या अफवेमुळे जम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त केली, असे मत गुलाम नबी आझाद यांनी व्यक्त केले आहे.
मेहबूबा मुफ्ती यांचं राज्यपालांना पत्र
आज सायंकाळी मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यपालांना पत्र लिहलं होतं. त्यात त्यांनी 'आमचा पीपल्स डेमोक्रॅटीक पक्ष हा विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष आहे. आमच्याकडे 29 आमदार आहेत, हे आपल्याला माहीतच आहे. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिल्याचे तुम्हाला मीडियातून माहिती पडलेच असेल. त्यामुळे नॅशनल कॉन्फरन्सचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 12 आमदार मिळून आमच्या सदस्यांची संख्या एकूण 56 होते. सध्या मी श्रीनगरला आहे. त्यामुळे तात्काळ तुम्हाला भेटू शकत नाही. तुम्हाला लवकरच भेटून आम्ही सरकार स्थापनेचा दावा करणार आहोत. हे या पत्राद्वारे तुम्हाला कळवू इच्छिते,' असे मेहबूबा यांनी या पत्रात म्हटले होते.
Have been trying to send this letter to Rajbhavan. Strangely the fax is not received. Tried to contact HE Governor on phone. Not available. Hope you see it @jandkgovernor pic.twitter.com/wpsMx6HTa8
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) November 21, 2018
'राजभवनात हे पत्र अद्याप पोहोचलेले नाही. आश्चर्य म्हणजे राजभवनातील फॅक्सवर हे पत्र अद्याप रिसिव्ह होताना दिसत नाही. राज्यपालांना फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. लवकरच त्यांच्याशी संपर्क साधला जाईल अशी आशा आहे,' असे ट्विटही मेहबूबा यांनी केले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement