एक्स्प्लोर

Jammu and Kashmir : पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहणाऱ्या दहशतवाद्यांवर मोठी कारवाई, संपत्ती जप्त करण्यास सुरुवात

पाकव्याप्त काश्मीरमध्ये (Kashmir ) आश्रय घेणाऱ्या सर्व स्थानिक दहशतवाद्यांवर (Terrorists) मोठी कारवाई सुरु करण्यात आली आहे.

Jammu and Kashmir News : पाकव्याप्त काश्मीरमध्ये (Kashmir ) आश्रय घेणाऱ्या सर्व स्थानिक दहशतवाद्यांवर (Terrorists) मोठी कारवाई सुरु करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीरचे (Jammu and Kashmir) मूळ रहिवासी असलेल्या मात्र, आश्रय घेण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पळून गेलेल्या सर्व दहशतवाद्यांची मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात केली आहे. जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक (डीजीपी) दिलबाग सिंग यांनी याबाबतची माहिती दिली आहे. राजौरी इथं आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत सिंग बोलत होते. पोलिसांकडे जम्मू-काश्मीरच्या विविध भागात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांची यादी असल्याचे सिंग म्हणाले.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये बसून दहशतवादाला प्रोत्साहन 

पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेलेल्यांची मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया सुरूच राहणार असल्याची माहितीदिलबाग सिंग यांनी दिली. या दहशतवाद्यांवर बारीक नजर ठेवली जात आहे. कारण ते नियंत्रण रेषेच्या (एलओसी) पलीकडे बसून दहशतवादाला प्रोत्साहन देत आहेत. त्या दहशतवाद्यांना कोणत्याही प्रकारची दयामाया दाखवली जाणार नाही, असे सिंगम्हणाले. जर त्यांनी परत येण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मारले जाईल असेही ते म्हणाले. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद पुनरुज्जीवित करण्याच्या प्रयत्नांमागे हे लोक असल्याचे सिंग म्हणाले. 

नियंत्रण रेषेजवळ काही ठिकाणी लष्करासह पोलीस तैनात

नियंत्रण रेषेपलीकडील दहशतवादाचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत. ग्राम संरक्षण समित्या (VDCs) दहशतवादविरोधी कारवायांमध्ये मोठी भूमिका बजावत आहेत. घुसखोरीचे सर्व मोठे प्रयत्न हाणून पाडण्यात आले असल्याचे सिंग म्हणाले. सीमा ग्रिड आणखी मजबूत करण्यासाठी नियंत्रण रेषेजवळ काही ठिकाणी लष्करासह पोलीस तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय तपास संस्थेसह इतर सुरक्षा यंत्रणा दहशतवादी संघटनांचा निधी रोखण्यासाठी त्यांच्या लपलेल्या ठिकाणांना लक्ष्य करत आहेत. पीओकेमध्ये दहशतवादी बनण्यासाठी आलेल्या जम्मू-काश्मीरमधील मूळ रहिवाशांची मालमत्ता जप्त करणे हा या नव्या हालचालीचा भाग म्हणून पाहिले जात आहे.

दहशतवादी कुलगाम-शोपियन जिल्ह्यांमधून ते जम्मू विभागातील राजौरी-पुंछ जिल्ह्यांकडे जात आहेत. यातील तिघांचा मृत्यू झाला असून इतरांचा शोध सुरू असल्याची माहिती दिलबाग सिंग यांनी दिली. डोंगरावरुन घसरलेला एक दहशतवादी रियासी येथे मृतावस्थेत आढळून आला आहे. तर राजौरी चकमकीत आणखी एक जण ठार झाला असून, तिसरा रियासी चकमकीत मारला गेला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीर सरकारची मोठी कारवाई! ISI दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या 3 अधिकाऱ्यांवर कारवाई

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget