(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jammu Kashmir : जम्मू-काश्मीर सरकारची मोठी कारवाई! ISI दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या 3 अधिकाऱ्यांवर कारवाई
LG Manoj Sinha Action : पाकिस्तानी दहशतवादी संघटना ISI साठी काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना जम्मू-काश्मीर सरकारने कामावरून काढून टाकलं आहे.
Jammu Kashmir Latest News : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात (Terrorist Acctivities) मोठी कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानी दहशतवादी संघटनांसाठी (Pakistan) काम करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना जम्मू-काश्मीर सरकारने कामावरून काढून टाकलं आहे. हे तीन अधिकारी पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांना माहिती पुरवत असल्याची सूत्रांची माहिता आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरुच असतात. या कारवाया मोडीत काढण्यासाठी जम्मू-काश्मीर प्रशासन आणि सैन्य दलाकडून प्रयत्न सुरुच असतात. मात्र, अधिकाऱ्यांकडूनच दहशतवादाला खतपाणी घातलं जात असल्याचं समोर आल्याने मोठी खळबळ माजली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई
पाकिस्तानी दहशतवादी संघटनांसोबत सक्रियपणे काम केल्याबद्दल जम्मू-काश्मीर सरकारने तीन अधिकाऱ्यांना सेवेतून हटवलं आहे. काश्मीर विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी (PRO) फहिम अस्लम, महसूल अधिकारी मोरब्बत हुसैन आणि पोलीस हवालदार अर्शद अहमद यांच्यावर जम्मू काश्मीर सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीर सरकारने पाकिस्तानी दहशतवादी संघटनांसोबत काम करणे आणि दहशतवाद्यांना रसद पुरवणे, दहशतवादी विचारसरणीचा प्रचार करणे, दहशतवादी वित्तपुरवठा करणे आणि फुटीरतावादी अजेंडा पुढे करणे या आरोपाखाली तीन कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकलं आहे. सरकारी सूत्रांच्या हवाल्याने ही मोठी माहिती समोर आली आहे.