एक्स्प्लोर
Advertisement
जम्मू-काश्मीरच्या अवंतीपुरामध्ये दहशतवाद्यांशी चकमक सुरु, दोन दहशतवादी लपल्याची माहिती
जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यामध्ये चकमक सरु, अनंतीपुराच्या शारशाली ख्रू भागात दोन दहशतवादी लपून बसल्याची सूत्रांची माहिती
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या अवंतीपूरा भागात सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात चकमक सरु आहे. काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार अनंतीपुराच्या शारशाली ख्रू भागात एन्काऊंटर सुरु आहे. या ऑपरेशनमध्ये सुरक्षा रक्षकांसोबत जम्मू काश्मीर पोलीस देखील सामील झाले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनंतीपुराच्या शारशाली ख्रू भागात दोन दहशतवादी लपून बसल्याची कळतं आहे. सुरक्षा रक्षक आणि जम्मू काश्मीर पोलीस योग्य पद्धतीने कारवाई सुरु आहे. अद्याप या चकमकीबद्दल अधिक माहिती समोर आलोली नाही.
दरम्यान जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्याच्या हंदवाडामध्ये रविवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचे 5 जवान शहीद झाले आहेत. यात एक कर्नल, एक मेजरसह दोन जवानांचा समावेश आहे. या कारवाईत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. यानंतर या परिसरातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात देखील शनिवारी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले आहेत. या हल्ल्यात लश्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर हैदरला कंठस्नान घालण्यात आलं असल्याची माहिती आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, दक्षिण काश्मीरमधील दंगेरपुरा परिसरात सुरक्षा दलाने ही कारवाई केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement