एक्स्प्लोर

PM Modi inaugurates Atal Bridge: इतिहास घडवण्यासाठी 'हे' लक्षात ठेवणे आवश्यक, मोदींनी केले 'अटल ब्रिज'चे उद्घाटन

PM Modi inaugurates Atal Bridge: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) शनिवारी गुजरातमधील (Gujrat) अहमदाबाद (Ahmadabad) येथे साबरमती नदीवरील (Sabarmati River)  अटल पुलाचे उद्घाटन केले.

PM Modi inaugurates Atal Bridge: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) शनिवारी गुजरातमधील (Gujrat) अहमदाबाद (Ahmadabad) येथे साबरमती नदीवरील (Sabarmati River)  अटल पुलाचे उद्घाटन केले. यावेळी साबरमती रिव्हरफ्रंटवर आयोजित खादी उत्सव कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना संबोधित केले. या ठिकाणाहून पंतप्रधानांच्या हस्ते फूट ओव्हर ब्रिजचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाच्या एक दिवस आधी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पुलाचे फोटो शेअर केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद शहरातील साबरमती नदीवरील एकमेव पादचारी अटल पुलाचे उद्घाटन केले. याला स्थानिक महापालिकेने माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांचे नाव दिले आहे. आकर्षक डिझाईन आणि LED लाइटिंगसह, हा पूल मध्यभागी सुमारे 300 मीटर लांब आणि 14 मीटर रुंद आहे. रिव्हरफ्रंटच्या पश्चिमेकडील फ्लॉवर गार्डन आणि पूर्वेकडील कला आणि संस्कृती केंद्राला जोडतो आहे.

अटल पुलाचे उद्घाटन करताना पीएम मोदी म्हणाले, "अटल पूल हा साबरमती नदीच्या दोन काठांनाच जोडणारा नाही, तर तो डिझाईन आणि नावीन्यपूर्ण बाबींमध्येही अभूतपूर्व आहे." ते म्हणाले, "गुजरातच्या प्रसिद्ध पतंग महोत्सवाचीही त्याच्या रचनेत काळजी घेण्यात आली आहे. साबरमतीचा हा किनारा आज धन्य झाला आहे." पंतप्रधान पुढे म्हणाले, ''इतिहास साक्षी आहे की खादीचा एक धागा स्वातंत्र्य चळवळीची शक्ती बनला. त्याने गुलामीच्या साखळ्या तोडल्या. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, स्वावलंबी भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खादीचा हाच धागा प्रेरणास्त्रोत बनू शकतो.''

पंतप्रधान मोदी म्हणाले, "स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ 7500 बहिणी आणि मुलींनी एकत्र चरखा चालवत सूत कताई करून नवा इतिहास रचला आहे. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, गांधीजींनी ज्या खादीला स्वातंत्र्य चळवळीत देशाचा स्वाभिमान बनवलं. त्याच खादीला स्वातंत्र्यानंतर हीन भावनेने पाहिलं गेलं. त्यामुळे खादी आणि खादीशी निगडित असलेले ग्रामोद्योग पूर्णपणे नष्ट झाले. खादीची ही स्थिती विशेषतः गुजरातसाठी अतिशय वेदनादायक होती.

पादचारी आणि सायकलस्वारांसाठी बनवला पूल

अटल पुलावर पादचाऱ्यांशिवाय सायकलस्वारही नदी ओलांडण्यासाठी या पुलाचा वापर करू शकतात. या लोकांना नदीकाठच्या मध्यापासून नदीचा किनारा पाहायला मिळेल. या पुलाची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की लोक खालच्या आणि वरच्या दोन्ही बाजूंनी किंवा रिव्हरफ्रंटच्या रिसॉर्टपर्यंत जाऊ शकतात. अटल ब्रिज 2,600 मेट्रिक टन स्टील पाईप वापरून बांधण्यात आला आहे. तर छत रंगीत कापडाचे बनलेले आहे. रेलिंग काच आणि स्टेनलेस स्टीलचे बनलेले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024Maha kumbha IIT Baba : आयआयटी शिकलेला अभय सिंग का बनला संन्यासी? बाबा माझावर EXCLUSIVEMaha kumbha Time Baba : कुंभमेळ्यात घडीवाले बाबांची चर्चा, हातात आणि पायात घड्याळच घड्याळABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget