(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PSLV-C51 launch:इस्रोने लॉन्च केलं PSLV 53 वं मिशन, या वर्षातील पहिली अंतराळ मोहीम
PSLV-C51 च्या माध्यमातून ब्राझीलचा अॅमेझोनिया - 1उपग्रहही अंतराळात पाठवला जाणार आहे. अॅमेझोनिया -1 प्रायमरी सॅटलाईट आहे.
बंगळुरु : इस्रोने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यावर्षीची यंदाची पहिली अंतराळ मोहीम लॉन्च केली आहे. PSLV द्वारे सकाळी 10 वाजून 24 मिनिटांनी 19 उपग्रहांचं अंतराळात प्रक्षेपण झालं. PSLV-C51 हे PSLV चे 53 वे मिशन आहे. या माध्यमातून ब्राझीलचा अॅमेझोनिया - 1उपग्रहही अंतराळात पाठवला जाणार आहे. अॅमेझोनिया -1 प्रायमरी सॅटलाईट आहे. तसेच अन्य 18 उपग्रह देखील प्रक्षेपित करण्यात आले आहे. त्यापैकी किड्झ इंडियाने एक उपग्रह तयार केला आहे.
ISRO launches PSLV-C51 carrying Amazonia-1 and 18 other satellites from Satish Dhawan Space Centre, Sriharikota pic.twitter.com/3bInFiKhje
— ANI (@ANI) February 28, 2021
ISRO नं म्हटलं आहे की, अमेझोनिया -1 च्या मदतीनं अमेझॉन क्षेत्रातील वनांची कत्तल आणि ब्राझीलमधील कृषी क्षेत्राशी संबंधित वेगवेगळ्या विश्लेषणांसाठी यूझर्संना रिमोट सेंसिंग डेटा प्रदान करण्यास मदत होईल तसेच वर्तमान संरचना आणखी मजबूत बनू शकेल. 18 अन्य सॅटेलाइट्समधील चार इन-स्पेस मधून आहे. यापैकी तीन सॅटेलाइट्स भारतातील शैक्षणिक संस्थानांच्या यूनिटीसॅट्समधील आहेत. यात श्रीपेरंबदुर स्थित जेप्पीआर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूरमधील जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि कोईंबतूरमधील श्री शक्ति इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नोलॉजी या संस्थांचा समावेश आहे. अन्य एकाची निर्मिती सतीश धवन सॅटेलाइट स्पेस किड्ज इंडियानं केली आहे तर बाकी 14 एनएसआयएलची निर्मिती आहे.
डिसेंबर 2020 मध्ये केलं होतं कम्युनिकेशन सॅटेलाईटचं यशस्वी प्रक्षेपण
परदेशी उपग्रहांची संख्या वाढून 342 वर
या वर्षातील भारतातील हे पहिले अवकाश अभियान PSLV साठी बरंच मोठं असणार आहे. कारण याच्या उड्डाणाची वेळमर्यादा एक तास 55 मिनिटं आणि 7 सेकंदांपर्यंत असणार आहे. आता भारताने प्रक्षेपित केलेल्या एकूण परदेशी उपग्रहांची संख्या वाढून 342 झाली आहे.