(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PSLV-C50 Launch Successful: ISRO च्या PSLV50 कम्युनिकेशन सॅटेलाईट CMS01 चे यशस्वी प्रक्षेपण
PSLV-C50 Launch, Sriharikota Successful: ISRO ने गुरुवारी दुपारी 3 वाजून 41 मिनीटांनी भारताचा नवीन कम्युनिकेशन सॅटेलाईट CMS01 लॉन्च केलाय. CMS01 ला PSLV50 च्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यासाठी बुधवार पासून 25 तासांचे काउंटडाउन सुरु होतं.
श्रीहरिकोटा: इस्त्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आलाय. इस्त्रोने गुरुवारी दुपारी 3 वाजून 41 मिनीटांनी भारताचा नवीन कम्युनिकेशन उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. या उपग्रहाचे प्रक्षेपण आंध्र प्रदेशमधील सतिश धवन स्पेस सेंटरमधून करण्यात आलं आहे. CMS01 ला PSLV50 च्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यासाठी बुधवार पासून 25 तासांचे काउंटडाउन सुरु होतं.
CMS-01 हा भारताचा 42 वा कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे. याच्या माध्यमातून भारतीय मुख्य भूमीसोबतच अंदमान- निकोबार आणि लक्षद्विप ही बेटंही कव्हर करण्यात येणार आहेत. हा उपग्रह सात वर्षापर्यंत काम करेल असं सांगण्यात आलं आहे. PSLV-C50 या 44 मीटर उंचीच्या सॅटेलाईटमध्ये चार स्टेजच्या इंजिनचा वापर करण्यात आला आहे. हे प्रक्षेपण PSLV या प्रकारातले 22 वे यशस्वी प्रक्षेपण आहे.
#PSLVC50 lifts off successfully from Satish Dhawan Space Centre, Sriharikota#ISRO #CMS01 pic.twitter.com/9uCQIHIapo
— ISRO (@isro) December 17, 2020
या वर्षातले इस्त्रोचं हे दुसरं प्रक्षेपण आहे. या आधी नोव्हेंबरच्या सुरुवातीला इस्त्रोने EOS-01 अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाईटचे यशस्वी प्रक्षेपण केलं होतं.
महत्वाच्या बातम्या: