ISRO : इसरो प्रथमच LVM-3 च्या माध्यमातून ब्रिटीश कंपनीचे 36 उपग्रह पाठवणार, कसे आहे हे शक्तिशाली रॉकेट?
ISRO : या रॉकेटला पूर्वी जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मार्क 3 म्हणजेच GSLV M3 असे म्हटले जात होते.
ISRO : देशातील सर्वात शक्तिशाली रॉकेट 'लाँच व्हेईकल मार्क 3' (LVM3) 23 ऑक्टोबर रोजी एका ब्रिटिश कंपनीचे 36 उपग्रह लॉन्च करणार आहे. इसरोकडून प्रथमच याचे प्रक्षेपण LVM-3 द्वारे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून रात्री केले जाईल. या रॉकेटला पूर्वी जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मार्क 3 म्हणजेच GSLV M3 असे म्हटले जात होते.
दोन लॉन्च सेवा करार
इसरोने सांगितले की, प्रक्षेपित होणारे उपग्रह रॉकेटच्या कॅप्सूलमध्ये ठेवून या मिशनची असेंबली पूर्ण झाली आहे. रॉकेटच्या क्रायो स्टेजचे तसेच कार्गोचे कामही पूर्ण झाले आहे. शनिवारी सकाळी संपूर्ण रॉकेट लाँच पॅडवर नेण्यात आले. या वर्षाच्या सुरुवातीला, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने माहिती दिली होती की, त्यांची व्यावसायिक शाखा न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) ने OneWeb कंपनीसोबत दोन लॉन्च सेवा करार केले आहेत. NSIL ही केंद्रीय अंतराळ विभागाच्या अंतर्गत येणारी कंपनी आहे. दुसरीकडे, OneWeb ही UK स्टार्टअप कंपनी आहे जी ISRO द्वारे OneWeb LEO (लोअर अर्थ ऑर्बिट) ब्रॉडबँड कम्युनिकेशन उपग्रह पाठवत आहे.
परदेशातील उपग्रह प्रक्षेपण
भारताने PSLV रॉकेटद्वारे जून 2022 पर्यंत 36 देशांसाठी 346 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. 1990 च्या दशकात याची सुरुवात झाली. 15 फेब्रुवारी 2017 रोजी, 104 उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित केले गेले, त्यापैकी बहुतेक यूएस, इस्रायल, यूएई, जर्मनी आदी 1975 ते फेब्रुवारी 2022 पर्यंत भारतासाठी 129 उपग्रह प्रक्षेपित केले गेले आहेत.
एनएसआयएल आणि इस्रोसाठी हे मिशन महत्वाचे
हे मिशन NSIL आणि ISRO साठी एक ऐतिहासिक ठरणार आहे, कारण LVM 3 ने जागतिक आणि व्यावसायिक लॉन्च मार्केटमध्ये प्रवेश केला आहे. हे ऑन-डिमांड लॉन्च आहे, याचा अर्थ भारत भविष्यात अनेक देश आणि कंपन्यांशी असेच करार करून आर्थिक लाभ घेऊ शकेल. या तीन टप्प्यातील रॉकेटमध्ये पृथ्वीपासून 37,000 किमी उंचीवर जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये 4,000 किलोपर्यंतचे उपग्रह ठेवण्याची क्षमता आहे.
संबंधित बातमी
ISRO : इसरोचं रॉकेट LVM3 M2 तयार, लाँच करणार 36 सॅटेलाइट, रात्री 12 वाजता सुरु होणार काउंटडाउन