एक्स्प्लोर
पुण्याच्या विद्यार्थ्यांच्या 'स्वयम्'सह 20 उपग्रहांचं इस्रोतर्फे प्रक्षेपण
श्रीहरिकोटा : एकाच अंतराळयानातून 20 उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन केंद्र अर्थात 'इस्रो' सज्ज झालं आहे. विशेष म्हणजे पुण्यातल्या सीओईपी अर्थात कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला 'स्वयम्' हा उपग्रह 'कॉर्टोसॅट टू' या उपग्रहाबरोबरच आकाशाकडे मार्गस्थ होणार आहे.
श्रीहरिकोटातील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रावरुन पीएसएलव्ही सी 34 हे यान एकूण 20 उपग्रहांसह बुधवारी अंतराळात झेपावणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच 20 उपग्रहांचं अवकाशात एकत्र प्रक्षेपण केलं जाणार आहे. पृथ्वीच्या निरीक्षणासाठी 'कार्टोसॅट 2' सोबत 19 उपग्रहांचं सकाळी 9 वाजून 26 मिनिटांनी प्रक्षेपण होणार आहे.
पुण्यातल्या सीओईपी अर्थात कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला 'स्वयम्' हा उपग्रह 'कॉर्टोसॅट टू' या उपग्रहाबरोबरच आकाशाकडे मार्गस्थ होणार आहे. 'पीएसएलवी 34' कॅनडा, इंडोनेशिया, जर्मनी आणि अमेरिकेच्याही काही उपग्रहांना सोबत घेऊन जाणार आहे. या उपग्रहातील 727.5 किलोग्रॅम वजनाचे 'कार्टो सॅट 2' हे मुख्य यान आहे.
देशभरात सध्या सगळीकडे 'मेक इन इंडिया'चा नारा दिला जात आहे. अशा परिस्थितीत सीओईपीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला 'स्वयम्' हा उपग्रह महत्त्वाचा ठरतो. सागरी सुरक्षितता आणि संवाद हे प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून 'स्वयम्'ची निर्मिती करण्यात आली आहे.
महत्त्वाचं म्हणजे 2008-09 पासून सीओईपी मध्ये शिकलेल्या वेगवेगळ्या शाखांचे सुमारे 170 विद्यार्थी या प्रकल्पात सहभागी झाले आहेत. इतकंच नाही तर यासाठी या विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास, परीक्षा, प्रॅक्टिकल्स सांभाळून हे काम केलं आहे.
अवकाशातल्या इतर उपग्रहांनी पाठवलेले संदेश साठवुन ठेवणं आणि त्यांचं डिकोडिंग करुन ते पृथ्वीवर पाठवणं हे स्वयम् चं मुख्य काम असेल. आपत्कालीन परिस्थितीत ही स्वयम् चा वापर व्हावा यासाठी भारतातल्या दहा, तर जगाच्या विविध भागातल्या ग्राऊंड स्टेशन्सशी स्वयम् जोडला जाणार असल्याचंही विद्यार्थी सांगतात.
भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं संरक्षण क्षेत्रातल्या शास्त्रज्ञांच्या भरीव संशोधनाची अपेक्षा डॉ. अब्दुल कलाम व्यक्त करत असत. त्या पार्श्वभूमीवर सीओईपीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येउन केलेलं संशोधन आणि स्वयम् ची निर्मिती इतर अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल हे निश्चित.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement