PFI च्या समर्थनार्थ ISIS दहशतवादी संघटना आली पुढे, भारताने घातली होती बंदी
Terror Magazine Of ISIS: जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी संघटना असलेली आयएसआयएस (ISIS) आता पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) समर्थनार्थ पुढे आली आहे.
Terror Magazine Of ISIS: जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी संघटना असलेली आयएसआयएस (ISIS) आता पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) समर्थनार्थ पुढे आली आहे. आयएसआयएसने (ISIS) पीएफआय (PFI) आणि एसआयएमआय (SIMI) संदर्भात व्हॉईस ऑफ खोरासान (Voice of Khorasan) या मासिकात एक लेख प्रकाशित केला आहे. या संपूर्ण लेखात पीएफआयचे (PFI) कौतुक करण्यात आले असून पोलिसांची (Police) ही कारवाई मुस्लिमांविरुद्ध असल्याचं सांगण्यात आली आहे.
मासिकात म्हटले आहे की, गोपूजक भारत सरकारने तथाकथित दहशतवादी गटांशी कथित संबंध असल्याबद्दल भारतीय मुस्लिमांमधील लोकप्रिय संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (PFI) पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. पीएफआयवर (PFI) भारतात नुकतीच बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांनी (Police) गेल्या काही महिन्यात या संघटनेशी संबंधित अनेक राज्यांतील कार्यालयांवर छापे टाकले. तसेच याच्याशी संबंधित अनेक नेत्यांना अटक देखील करण्यात आली.
एनआयए (NIA) बिहारमध्ये पीएफआय (PFI) विरोधात करत आहे कारवाई
आयएसआयएसच्या (ISIS ) या मासिकेत गेल्या सात दशकांपासून कट्टरवादी हिंदू राज्ये मुस्लिमांवर हिंसाचार करत असल्याचे म्हटले आहे. या पद्धतीचा वापर करून देशात संघटनेशी संबंधित अनेक लोकांना अटक आणि त्यानंतर पीएफआय (PFI) कार्यकर्त्यांवर बंदी घालण्यात आली. हा लेख अशा वेळी आला आहे जेव्हा बिहारमध्ये (Bihar) पीएफआय संदर्भात एनआयएची कारवाई अजूनही सुरू आहे. एनआयएने (NIA) पीएफआय (PFI) प्रकरणातील सातवा आरोपी इर्शाद मोहम्मद याला अटक केली. यातीलच एक आरोपी बेलाल (Md. Belal) याला जितोरा गावातून अटक करण्यात आली.
पीएफआयवर पोलिसांची कारवाई
केंद्रीय गृह मंत्रालयाने (union home minister of india) 28 सप्टेंबर रोजी यूएपीए (UAPA) कायद्यांतर्गत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) वर 5 वर्षांसाठी बंदी घातली होती. एनआयएने केरळच्या कोल्लम जिल्ह्यातून पीएफआयशी संबंधित एका व्यक्तीला अटक केली आणि त्यावेळी तपासादरम्यान तो बेकायदेशीर कामात गुंतल्याचे न्यायालयाला सांगितले. पोलिसांचा (Police) आरोप आहे की, पीएफआय विविध जाती आणि धर्माच्या लोकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा, कायद्याला बाधा आणण्याचा आणि अहिंसा पसरवण्याचा प्रयत्न करते. पीएफआय (PFI) तरुणांना दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी प्रेरित करते. यानंतर पीएफआयवर त्वरीत कारवाई करण्यात आली.
इतर महत्वाच्या बातमी: