एक्स्प्लोर

रेल्वे बुकिंगसाठी SBI आणि ICICI सह 6 बँकांचं कार्ड वापरण्यास बंदी

आयआरसीटीसी आणि एसबीआय आणि आयसीआयसीआय बँकेसह 6 बँकांमध्ये सुविधा शुल्क आकारण्याच्या मुद्द्यावरुन मतभेद झाल्याने, आयआरसीटीसीने तिकीट बुकिंगसाठी SBI आणि ICICI सह 6 बँकांच्या कार्ड वापरण्यास बंदी घातली आहे.

नवी दिल्ली : आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन तिकीट बुक करत करणाऱ्या प्रवाशांना आता काही ठराविक बँकांच्या कार्डवरुन तिकीट बुक करता येणार नाही. कारण, आयआरसीटीसीने तिकीट बुकिंगसाठी स्टेट बँक आणि आयसीआयसीआय बँकेसह 6 बँकेच्या डेबिट अथवा क्रेडीट कार्ड वापरण्यास बंदी घातली आहे. आयआरसीटीसी आणि एसबीआय आणि आयसीआयसीआय बँकेसह 6 बँकांमध्ये सुविधा शुल्क आकारण्याच्या मुद्द्यावरुन मतभेद झाल्याने, आयआरसीटीसीने हा दणका दिला आहे. सध्या आयआरसीटीसीने तिकीट बुकिंगसाठी एचडीएफसी, इंडिन ओवरसीस बँक, कॅनरा बँक, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनायटेड बँक ऑफ इंडिया, अॅक्सिस बँकच्या डेबिट अथवा क्रेडीट कार्डच्या वापरास परवानगी दिली आहे. पण या व्यतिरिक्त इतर बँकांचे कार्ड वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. नोटाबंदीनंतर आयआरसीटीसीने आपल्या सुविधा शुल्कामध्ये 20 रुपयांनी कपात केली आहे. त्यामुळे यापूर्वी आयआरसीटीसीने बँक सुविधा शुल्काची रक्कम वाटण्याची सूचना केली होती. यावरुन इंडियन बँक असोसिएशन आणि आयआरसीटीसीमध्ये प्रदीर्घ चर्चा सुरु होती. पण या मुद्द्यावरुन समाधानकारक तोडगा निघाला नाही, बँकांनी आयआरसीटीच्या सुचनेला स्पष्ट शब्दात नकार दिल्याने, आयआरसीटीसीने कठोर भूमिका घेतली आहे. दरम्यान, ऑनलाईन पेमेंटची सुविधा वापरण्यासाठी जो व्यापारी बँकेची ही सुविधा वापरतो. त्याला यासाठी काही शुल्क द्यावं लागते. यातील शुल्काची रक्काम बँक आणि कार्ड सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आपापसात वाटून घेतात. म्हणजेच तिकीटाचा दर 100 रुपये असल्यास त्यातील 98 रुपये आयआरसीटीसीला मिळतात. तर उर्वरित 2 रुपये बँक आणि सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आपासात वाटून घेतात. त्यामुळे आयआरसीटीसीला नुकसान सहन करावे लागते. याचवरुन आयआरसीटीसीनेही पूर्ण रक्कम मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. पण बँकांनी आयआरसीटीसीचं म्हणणं मान्य करण्यास नकार दिला आहे. कारण, बँकांच्या मते, हे व्यापारी अॅक्वायरिंग बिझनेसच्या सिद्धांताचं उल्लंघन करत आहेत. सध्या बँका 1000 रुपयाच्या कार्ड ट्रन्झॅक्शनवर 0.25 टक्के तर  एक हजार ते दोन हजार रुपयापर्यंतच्या व्यवहारावर 0.5 टक्के एमडीआर आकारतात. यापेक्षा जास्तीच्या रकमेच्या व्यवहारावर 1 टक्क्यापर्यंत एमडीआर आकारला जातो. हे दर नोटाबंदीनंतर रिझर्व बँक ऑफ इंडियाद्वारे दिलेल्या दिशानिर्देशानुसार निश्चित करण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
CJP : कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?  सौरव दास, आशुतोष रांका यांच्यावर कोणती जबाबदारी?
कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?
PM Modi Instagram Reel :'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ
'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Bhandara Crime News: भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Maharashtra Live blog updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
Maharashtra Live blog updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
Embed widget