एक्स्प्लोर
शिवरायांच्या युद्धनितीला सलाम, पाणबुडीला 'खांदेरी' नावं
![शिवरायांच्या युद्धनितीला सलाम, पाणबुडीला 'खांदेरी' नावं Ins Khanderi Indias Second Scorpene Class Submarine Launched शिवरायांच्या युद्धनितीला सलाम, पाणबुडीला 'खांदेरी' नावं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/12091635/Submarine-Khanderi.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : भारताच्या नौदलाच्या ताफ्यात खांदेरी ही अत्याधुनिक पाणबुडी दाखल झाली आहे.
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते 'खांदेरी'चे जलावतरण मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये करण्यात आले. नौदलप्रमुख सुनील लांबा यावेळी उपस्थित होते.
फ्रान्सची मेसर्स डीसीएनएस कंपनी आणि माझगाव गोदी यांनी संयुक्तरित्या या पाणबुडीची बांधणी केली आहे.
छत्रपती शिवरायांनी सागरावर प्रभुत्व ठेवण्यासाठी खांदेरी बेटावर केलेल्या लढायांची स्मृती जपण्यासाठी पाणबुडीला खांदेरी हे नाव देण्यात आलं आहे.
खांदेरीची वैशिष्ट्ये
खांदेरी पाणबुडी ही डिझेल आणि वीजेवर चालणारी आहे. अचूक लक्ष्यभेद करण्यासाठी खांदेरी महत्त्वाची भूमिका बजावू शकते. अचूक मिसाईल डागूनण्याची क्षमता खांदेरीमध्ये आहे.
खांदेरीमध्ये ट्यूबद्वारे लाँच होणाऱ्या अँटीशिप मिसाईल्सचाही समावेश आहे. या मिसाईल्स पाण्यात किंवा बाहेर डागता येऊ शकतात.
![शिवरायांच्या युद्धनितीला सलाम, पाणबुडीला 'खांदेरी' नावं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/12091635/Submarine-Khanderi-1.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
बीड
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)