एक्स्प्लोर
आर्थिक मंदीचा फटका! इन्फोसिस 12 हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ
देशातील आर्थिक मंदीचा फटका आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांना बसू लागला आहे. कॉग्निझंट या आयटी कंपनीने नुकतीच आपली कामगार कपात केली त्याच पद्धतीने इन्फोसिस देखील कामगार कपातीच्या पवित्र्यात आहे.
बंगळुरू : आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी इन्फोसिस मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. वरिष्ठ आणि मधल्या पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनी कामावरून काढणार आहे. यानुसार इन्फोसिस १० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याची माहिती आहे. याअगोदर आयटी क्षेत्रातील मातब्बर कंपनी कॉग्निझंटने मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली होती.
सध्या देशात मंदीचे वातावरण असून, त्याची झळ आयटी कर्मचाऱ्यांना बसू लागली आहे. कंपन्या कर्मचाऱ्यांना काढताना विविध कारणे देत आहेत. त्यामध्ये कामातील असमाधानकारक कामगिरी हे प्रमुख कारण आहे. इन्फोसिसच्या वरिष्ठ पदांवर ९७१ अधिकारी आहेत. असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट, व्हाइस प्रेसिडेंट, एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट यासारख्या वरिष्ठ पदांवरील अधिकाऱ्यांनाही इन्फोसिस कामावरून काढणार आहे. या वरिष्ठ पदांवरील किमान ५० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाणार आहे.
इन्फोसिसमध्ये एकूण १.१ लाख कर्मचारी आहेत. यापैकी जॉब लेव्हलनुसार कर्मचाऱ्यांना काढण्यात येणार आहे. इन्फोसिसमधील कर्मचारी कपात ही अतिशय स्पष्टपणे आणि लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून केली जाणार आहे. यापूर्वी कंपनीने कामगिरीच्या आधारावर कपात केली होती. यावेळी मात्र तसा विचार करण्यात येणार नाही. यामुळे अधिक कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
क्राईम
Advertisement