Indian Navy : नौदलात दाखल होणार 'रोमियो'! भारताची समुद्री ताकद आणखी वाढणार
MH 60R Helicopter : भारतीय नौदल अँटी सबमरिन हेलिकॉप्टर सामील करणे, ही तंत्रज्ञान आणि आधुनिकतेच्या दृष्टीने आणखी एक मोठं पाऊल आहे. भारतीय नौदलात 6 मार्चला MH-60 Romeo हेलिकॉप्टर दाखल होणार आहेत.
Indian Navy : भारताची समुद्री ताकद आणखी वाढणार आहे. भारतीय नौदलात नवा योद्धा सामील होणार आहे. भारतीय नौदलात MH-60R सी हॉक हेलिकॉप्टर (MH-60 Romeo Helicopter) दाखल होणार आहे. भारतीय नौदलासाठी बुधवार हा मोठा दिवस आहे. 6 मार्च रोजी MH-60 Romeo हेलिकॉप्टर नौदलात सामील करण्यात येतील. संरक्षण मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. संरक्षण मंत्रालयाकडून MH60R Seahawk हेलिकॉप्टरचा व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे.
भारताची समुद्री ताकद आणखी वाढणार
भारतीय नौदल 6 मार्च, 2024 ला MH60R Seahawk मल्टी-रोल हेलिकॉप्टर आपल्या ताफ्यात समाविष्ट करेल. भारतीय नौदल अँटी सबमरिन हेलिकॉप्टर सामील करणे, ही तंत्रज्ञान आणि आधुनिकतेच्या दृष्टीने आणखी एक मोठं पाऊल आहे. या हेलिकॉप्टरमुळे समुद्राच्या तळाशी असणाऱ्या शत्रुच्या पाणबुड्या नष्ट करण्यात भारतीय नौदलाला मदत होईल. कोची (Kochi) येथील आयएनएस गरुडमध्ये (INS Garuda) मध्ये नवीन स्क्वाड्रन बनवून हेलिकॉप्टर सामील करण्यात येणार आहे.
नौदलात दाखल होणार नवा योद्धा
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर पाणबुडीविरोधी युद्ध, जमिनीवरील युद्ध, शोध आणि बचाव कार्य तसेच वैद्यकीय स्थलांतर आणि समुद्रातील जहाजांना पुरवठा करण्याच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आलं आहे. 2020 मध्ये अमेरिकेसोबत MH-60R रोमिओ 24 हेलिकॉप्टरचा करार करण्यात आला होता. यापैकी सहा हेलिकॉप्टर भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आले आहेत. या हेलिकॉप्टरचे स्क्वाड्रन आयएनएस 334 या नावाने ओळखलं जाईल. हे हेलिकॉप्टर समुद्रात शत्रूच्या पाणबुड्या शोधून नष्ट करण्यात मदत करते.
MH-60 Romeo हेलिकॉप्टरचा व्हिडीओ समोर
Milestone in India's defence modernisation journey as the @indiannavy commissions the MH 60R Seahawk multi-role helicopters on 06 Mar 24, at INS Garuda, Kochi. #IndianNavy#MH60RSeahawk #DefenceModernization
— A. Bharat Bhushan Babu (@SpokespersonMoD) March 3, 2024
More: https://t.co/E8YkyPuTeI@rajnathsingh@giridhararamane pic.twitter.com/qdsAQbYPti
युद्धनौका आयएनएस विक्रांतवर तैनात करणार
MH60R Seahawk मल्टी-रोल रोमियो हेलिकॉप्टर स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतवर तैनात करण्याची भारतीय नौदलाची योजना आहे. हे हेलिकॉप्टर फ्रिगेट्स, कॉर्वेट्स किंवा विनाशकांपासून देखील ऑपरेट केले जाऊ शकते. रोमिओची निर्मिती अमेरिकन कंपनी स्कॉर्स्की करते. या रोमियो हेलिकॉप्टरचे एकूण पाच प्रकार आहेत.
नौदलाच्या सागरी सामर्थ्यात वाढ
नौदलाच्या अधिकाऱ्यानी सांगितलं की, सीहॉक हेलिकॉप्टर INAS इंडियन नेव्हल एअर स्क्वॉड्रन 334 नावाच्या नवीन स्क्वॉड्रनमध्ये कार्यान्वित केले जातील आणि त्यांच्या समावेशामुळे नौदलाच्या सागरी सामर्थ्यात लक्षणीय वाढ होईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :