एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हवाईदलाच्या विमानाचा 48 तासानंतरही पत्ता नाहीच
नवी दिल्लीः वायूदलाचं 'AN-32' हे विमान गायब होऊन आता जवळपास 48 तास होत आहेत. त्यामुळे हे विमान सापडण्याची शक्यता आता धुसर होत चालली आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी चेन्नईत जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या पी8आय या विमानातून संपूर्ण शोधमोहीमेची माहिती पर्रीकर यांनी घेतली आहे. मात्र 48 तास उलटूनही विमानाचा काही थांगपत्ता नसल्यामुळे चिंतेची बाब बनली आहे.
या विमानाने 29 जणांना घेऊन शुक्रवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास चेन्नईच्या तंबराम बेसवरुन उड्डाण भरलं. मात्र 16 मिनीटांच्या प्रवासानंतर या विमानाचा मुख्य रडार यंत्रणेशी संपर्क तुटला. 'AN-32' या विमानात सहा क्रू मेंबरसह 29 जण आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सिंधुदुर्ग
Advertisement